Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: नोकरी येथील नाल्याच्या पाण्यात वाहून गेलेल्या संजयचा लागला शोध
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
नोकरी येथील नाल्याच्या पाण्यात वाहून गेलेल्या संजयचा लागला शोध चौथ्या दिवशी आढळला मृतदेह धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी राजुरा - न...
नोकरी येथील नाल्याच्या पाण्यात वाहून गेलेल्या संजयचा लागला शोध
चौथ्या दिवशी आढळला मृतदेह
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
नोकरी (बु) येथील संजय कंडलेवार वय 50 वर्षे हा व्यक्ती दिनांक 10 जुलै रोजी सकाळी 9 वाजता नोकारी बु. (माईंस) येथील नाल्याच्या प्रवाहात वाहून गेला होता त्याचा पोलीस शोध पथक व स्थानिक लोकांनी शोध करीत होते. आज चौथ्या दिवशी अमलनाला धरणात शंकरदेव समोर भागात आढळून आला.
शंकर कंडलेवार हा गावाकडे परत येत नाल्याच्या पाण्याचा अंदाज न आल्याने प्रवाहात वाहून गेला होता. या बद्दल माहिती मिळताच दोन्ही बाजुने अमलनाला धरणा पर्यंत व धरणात शोध घेतला असता कुठेच आढळून आला नाही. शोध घेण्यासाठी दि. 11जुलै रोजी नोकारी बु. व अमलनाला धरण येथे चंद्रपूर येथील चंद्रपूर पोलीस विभागाचे शोध पथक दाखल झाले व शोध घेतला असता त्याना सुध्दा या शोधात यश येत नव्हते. पावसाचे व पुराचे वाढते प्रमाण पाहता शोध घेण्यात अडथळा निर्माण होत होता अखेर आज त्याचा मृत्यूदेह तरंगताना आढळून आला. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला. पुढील कार्यवाही गडचांदूर पोलीस करीत आहेत.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top