Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: डाक विभागाची विमा योजना
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
डाक विभागाची विमा योजना फक्त 299 आणि 399 रुपयांमध्ये 10 लाखाचा विमा नागरिकांना लाभ घेण्याचे आवाहन आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क चंद्रपूर - भार...
डाक विभागाची विमा योजना
फक्त 299 आणि 399 रुपयांमध्ये 10 लाखाचा विमा
नागरिकांना लाभ घेण्याचे आवाहन
आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क
चंद्रपूर -
भारतीय डाक विभागाने सर्वसामान्य नागरिकांसाठी विमा योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून अपघात संरक्षण दिले जाणार आहे. 18 ते 65 वर्षांपर्यंतच्या सर्व नागरिकांना या विमा योजनेत सहभागी होता येणार आहे. विशेषतः पोस्टमन, तसेच पोस्ट कर्मचारी नागरिकांच्या घरोघरी जाऊन विमा काढणार आहेत. पोस्टाची ही योजना नागरिकांसाठी उपयुक्त असून या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 299 आणि 399 रुपयाच्या हप्तामध्ये एका वर्षात 10 लाख रुपयापर्यंतचा विमा मिळणार आहे. यामध्ये अपघाती मृत्यु, अपंगत्व असल्यास 10 लाख रुपयांचे संरक्षण दिले जाणार आहे. रुग्णालयात दाखल झाल्यास 50 हजार रुपयापर्यंतचा खर्च आणि रुग्णालयात दाखल न होता घरी उपचार घेतल्यास 30 हजार रुपयांचा दावा देखील करता येणार आहे. एवढेच नाही तर रुग्णालयात खर्चासाठी 10 दिवसांसाठी प्रती दिन एक हजार रुपये देखील मिळणार आहे. या विम्यांतर्गत दोन मुलांच्या शिक्षणासाठी एक लाख रुपयापर्यंतची रक्कमही मिळणार आहे. योजनेचा कालावधी एक वर्षाचा आहे. एक वर्ष संपल्यानंतर पुढील वर्षी विमा योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी पुन्हा नूतनीकरण करावे लागणार आहे. विमा काढण्यासाठी कोणत्याही पोस्ट कार्यालयात जाऊन नव्याने खाते काढून विमा काढता येणार आहे. 18 ते 65 वर्षांपर्यंतचे सर्व नागरिक यामध्ये सहभागी होऊ शकणार आहेत. पोस्टमन, पोस्ट कर्मचारी घरोघरी जाऊन नागरिकांचा विमा काढणार आहेत. अधिकाधिक नागरिकांनी या योजनेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

पॉलिसीमधील फरक
या दोन्ही योजना सारख्याच पण 399 या योजनेत विमा धारकांचा अपघाती मृत्युनंतर दोन मुलांना 1 लाखापर्यतची मदत मिळू शकते. तसेच अपघातानंतर दवाखान्यात जाण्यासाठी कुटुंबीयांना 10 दिवसापर्यंत प्रतिदिवस 1 हजार रु. मिळतात वाहतूक खर्च 25 हजार मृत्युनंतर 5 हजार अंत्य संस्कारासाठी मिळतात. मात्र 299 या योजनेला शिक्षणखर्च, प्रतिदिन 1 हजार, वाहतूक खर्च, अंत्यसंस्कार खर्च लागू नाही. 

योजनेमध्ये यांना मिळणार नाही लाभ
आत्महत्या, डास चावणे, ड्रग्ज, अल्कोहोल किंवा इतर मादक पदार्थांच्या प्रभावाखाली असल्याने उद्भवलेला अपघात, प्रत्यक्ष केलेल्या किंवा प्रयत्न केलेल्या गुन्ह्यात सहभाग, दंगल, गुन्हा,गैरवर्तन, कोणत्याही विमान किंवा विमान सेवेशी निगडित व्यक्ति, कोणत्याही स्फोटक, आण्विक उपकरणांचे किरणोत्सर्गी, विषारी, स्फोटक किवा इतर धोकादायक गुणधर्म असलेल्या व्यवसायातील कर्मचारी, वैद्यकीयदृष्ट्या आवश्यक नसतांना रुग्णालयात घेतलेला उपचार, बाळंतपणामुळे किंवा गर्भधारणेमुळे होणारे कोणतेही नुकसान, कोणत्याही ड्रायव्हिंग व्यवसायाशी संबंधित व्यक्ती, युद्ध किवा युद्धाची कोणतीही कृती,आक्रमण, विदेशी यांना योजनेचा लाभ मिळणार नाही.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top