Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: बुडणाऱ्याला वाचवताना तरुणाचा मृत्यू
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
बुडणाऱ्याला वाचवताना तरुणाचा मृत्यू संपूर्ण थरार कॅमेऱ्यात कैद आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क चंद्रपूर - तलावावरील बंधाऱ्यावरून एक जण वाहून गेल...
बुडणाऱ्याला वाचवताना तरुणाचा मृत्यू
संपूर्ण थरार कॅमेऱ्यात कैद
आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क
चंद्रपूर -
तलावावरील बंधाऱ्यावरून एक जण वाहून गेला. तो अडकला असताना त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात दोन जणांनी आपला जीव धोक्यात टाकला. हा थरार कॅमेऱ्यात कैद झाला. या घटनेत नंदलाल कैथवास (३६) रा. संतोषी माता वॉर्ड बल्लारपूर या तरूणाचा मृत्यू झाला आहे. ही घटना शुक्रवार दि. २९ जुलै ला सायंकाळच्या सुमारास जुनोना येथे घडली.
जुनोना तलाव तुडुंब भरल्याने त्यावर बांधलेला बंधारा ओव्हरफ्लो झाला आहे. यात एक व्यक्ती वाहून गेला. त्याला वाचवण्यासाठी गावकऱ्यांचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. दोरीच्या साहाय्याने तो तग धरून होता. त्याला ओढण्याच्या प्रयत्नात दोघांचा तोल गेला. त्यातील एकाला कसेबसे पकडण्यात आले. मात्र दुसरा या प्रवाहात ओढला गेला आणि गटांगळ्या खायला लागल्या. त्याला वाचवण्यासाठी तिसऱ्याने उडी मारली आणि थोड्या वेळात तोदेखील पाण्यात पडला. हा सर्व थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. एकोर्निया या वनस्पतीच्या झुडुपामुळे त्यांना वाचवण्यास अडचण येत होती. 
बल्लारपूर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून गर्दीवर नियंत्रण मिळवले, जेसीबीच्या सहाय्याने कचरा हटविण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र सर्व प्रयत्न फसले. घटनास्थळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे, रात्री अंधार जास्त झाल्याने बुडालेल्या तरुणाचा शोध घेण्यात अडचण जात होती. आज पुन्हा शोध मोहीम राबविली जात आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top