Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: वेकोलिच्या दत्तक गावातील शालेय विध्यार्थ्यांची गैरसोय
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
वेकोलिच्या दत्तक गावातील शालेय विध्यार्थ्यांची गैरसोय धोपटाला येथील गैर कर्मचाऱ्यांच्या मुलांना वेकोलिच्या बसने प्रवास करण्यासाठी पैश्याची म...
वेकोलिच्या दत्तक गावातील शालेय विध्यार्थ्यांची गैरसोय
धोपटाला येथील गैर कर्मचाऱ्यांच्या मुलांना वेकोलिच्या बसने प्रवास करण्यासाठी पैश्याची मागणी
बबन उरकुडे यांच्या मध्यस्थीने सोमवारपासून बससेवा सर्वांसाठी सुरु करण्याचे कंपनी प्रशाशनाचे आश्वासन
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
वेकोलिच्या कार्यालयाला लागून असलेल्या धोपटाला हे गाव वेकोलिने दत्तक घेतले असून या परिसरात आरोग्य, शालेय आणि इतर सुविधा पुरवण्याची जबाबदारी ही सर्वस्व वेकोलिची आहे.
धोपताला येथील गैरकर्मचाऱ्याच्या विध्यार्थ्यांना बससेवेसाठी बसचालकांकडून पैस्याची मागणी केली जात असल्याची तक्रार शिवसेना विधानसभा समन्वयक बबन उरकुडे यांच्याकडे स्थानिक नागरिकांनी केली. शिवसेना पदाधिकाऱ्यांनी नागरिकांसह माहाप्रबंधकाला भेट देत पूर्ण सोयीसुविधा देण्याची मागणी केली. त्यावर त्वरित कार्यवाही करत ही बससेवा सोमवारपासून सर्व विध्यार्थ्यांसाठी मोफत राहील अशी माहिती मिळाली.
याप्रसंगी युवासेना तालुका प्रमुख बंटी मालेकर, राजू काटम, अनुसुरिया नुत्ती, विशाल दुपारे, विजय मनचाला, रघू तलारी, कृष्णा राधारप, शामराव मृत्यूमुरी श्रीनिवास लिगला, नौशाद सय्यद, शैलेश आणि  नागरिक उपस्थित होते. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top