Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: आत्मा अंतर्गत शेतकरी कुटुंबांना सुरक्षित अन्नधान्य किट चे वितरण
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आत्मा अंतर्गत शेतकरी कुटुंबांना सुरक्षित अन्नधान्य किट चे वितरण विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी राजुरा - राजुरा तालुक्यातील मौजा भाग...
आत्मा अंतर्गत शेतकरी कुटुंबांना सुरक्षित अन्नधान्य किट चे वितरण
विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
राजुरा तालुक्यातील मौजा भागूलवाही कोष्टाळा येथे कृषी विभाग राजुरा आत्मा अंतर्गत पोषणयुक्त सुरक्षित अन्न सुरक्षा योजनेत जंगुदेवी महिला बचत गटाअंतर्गत शेतकरी कुटुंबाला विविध भाजीपाला कडधान्य बियाणे मिनीकिट चे वितरण करण्यात आले. या प्रसंगी आत्माचे अध्यक्ष तिरुपती इंदुरवार यांनी सदर कार्यक्रमाचे उद्देश समजावून सांगितले, येणाऱ्या उत्पादनातून पोषणमूल्याची गरज भागवणे शक्य होईल, विषमुक्त सुरक्षित अन्न शेतकरी कुटुंबाला मिळू शकेल तसेच तळागाळातील लोकांपर्यंत शासकीय योजना, माहिती पोहचून त्यांना सुरक्षित अन्न घटक मिळेल त्यामुळे असे उपक्रम अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. 
या प्रसंगी तालुका शेतकरी सल्लागार समितीचे अध्यक्ष तिरुपती मलाया इंदूरवार, तालुका कृषी अधिकारी सी.के.चव्हाण, मंडळ कृषी अधिकारी व्ही.के. मकपल्ले, कृषी पर्यवेक्षक आर.आर.गादंगीवार, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक के.व्ही.चंदनबटवे, शेतकरी मित्र नामदेव रोहणे तसेच उमेदच्या श्रीमती शीला जाधव व समस्त भगुलवाई येथील महिला शेतकरी ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top