अनोळखी मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे आवाहन
आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क
चंद्रपूर -
राजुरा पोलीस स्टेशनअतंर्गत मौजा चुनाळा येथील रामप्रसाद वडस्कर यांच्या शेतातील विहीरीत एक अनोळखी व्यक्ती पाण्यात बुडून मरण पावल्याची माहिती राजुरा, पोलीस स्टेशनला प्राप्त झाली. मृतकाच्या नातेवाईकाचा शोध घेतला असता अजूनपर्यंत मिळून आलेले नाही. तसेच सदर मृतकाची ओळख देखील पटली नाही. त्या मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी अधिक तपास पोलीस स्टेशन, राजुरामार्फत करण्यात येत आहे.
सदर मृतक हा अनोळखी असून त्याचे वय अंदाजे 30 ते 40 वर्षे आहे. वर्ण सावळा, उंची अंदाजे 165 से.मी., मजबुत बांधा, बसके नाक, टपोरे डोळे, काळे केस, गोल चेहरा व कपाळ मोठे, अंगात हिरव्या रंगाची हॉफ टी शर्ट ज्यावर life is not just delusion असे लिहीले असून लाल रंगाचा पट्टा आहे.
सदर वर्णनाच्या मृतक व्यक्तीबाबत माहिती असल्यास पोलीस स्टेशन, राजुरा येथील पोलीस निरीक्षक चंद्रशेखर बहादुरे 9689990505, पोलीस उपनिरीक्षक ओ.टी. गेडाम 9923294634 अथवा पोलीस स्टेशन राजुरा 07173-222128 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. असे राजुरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर बहादुरे यांनी कळविले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.