Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी सत्तेसोबत राहणे गरजेचे - आ. किशोर जोरगेवार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी सत्तेसोबत राहणे गरजेचे - आ. किशोर जोरगेवार चंद्रपूर - मागील अडीच वर्षे महाविकास आघाडी सरकार सोबत राहुन म...
मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी सत्तेसोबत राहणे गरजेचे - आ. किशोर जोरगेवार
चंद्रपूर -
मागील अडीच वर्षे महाविकास आघाडी सरकार सोबत राहुन मतदार संघातील प्रश्न सोडविण्यासह विकासासाठी मोठा निधी उपलब्ध करता आला. याच दरम्याण घुग्घुस नगर परिषद निर्मितीचा प्रलंबित विषय मार्गी लागला. सत्तेच्या बाजुने असल्यामुळे अपक्ष असुनसुध्दा 287 कोटी रुपयांची व्याघ्र सफारी, तिर्थक्षेत्र वढा येथील विकासासाठी 44 कोटी रुपये, बाबुपेठ उड्डाणपुलासाठी उर्वरित निधी मंजूर, मनपा हद्दवाढीच्या दिशेने प्रयत्न प्रलंबित असलेल्या घुग्घुस रेल्वे उड्डाणपुलासाठी 60 कोटी रुपये असे अनेक कामे मार्गी लावु शकलो. त्यामुळे पुढेही चंद्रपूर मतदार संघाचा सर्वसमावेशक विकास करायचा असेल तर सत्तेसोबत राहणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रसिध्द केलेल्या पत्रातुन व्यक्त केली आहे.
आमदार किशोर जोरगेवार म्हणाले कि, काल गुरुवारी सांयकाळी सर्व बाजु तपासुन आणि मतदार संघातील नागरिकांशी चर्चा करुन मी एकनाथ शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेत असतांना चंद्रपूर मतदार संघाचा विकासासह येथील प्रलंबित मागण्यापूर्ण करणे हा एकमात्र उद्देश होता. साधारणत: मतदार संघातील कामे करण्यासाठी अपक्ष हा सत्तेबरोबर राहत असतो. मागील अडीच वर्षात सत्तेसोबत असल्यामुळे कोरोणा काळातही मतदार संघातील विकासासाठी आपण मोठा निधी खेचुन आणाला. यात साखरवाही रेल्वे उड्डाणपुलासाठी 19 कोटी रुपये, ग्रामविकास निधी अंतर्गत 12 कोटी रुपये, पांदन रस्त्यांसाठी 12 कोटी, चंद्रपूर येथील जगन्नाथबाबा मठ माना टेकडीच्या विकासासाठी निधी उपलब्ध करता आला, दिक्षाभुमी येथील अभ्यासिकेसह अनुषंगिक कामांसाठी 1 कोटी रुपये, रामनगर येथील जगन्नाथ बाबा मठाच्या विकासासाठी 1 कोटी रुपये, बाबुपेठ उड्डाण पुलासाठी 5 कोटी 26 लक्ष रुपये, रयतवारी कॉलनी येथील झरपट नदीवरील ब्रिज कम बंधारा बांधकामासाठी 3 कोटी 50 लक्ष रुपये, राजिव गांधी नगर येथील मॅग्झीन रोडसाठी 2 कोटी रुपये रुपये, बाबुपेठ स्मशानभुमीच्या विकासासाठी 2 कोटी रुपये, अल्पसंख्यांक वस्तींच्या विकासासाठी 1 कोटी 25 लक्ष रुपये, दलीत वस्ती अंतर्गत 5 कोटी रुपये, घुग्घुस साखरवाही रोडसाठी 19 कोटी रुपये, येरूर-वांढरी रस्त्याकरिता 6 कोटी रुपये, छोटा नागपुर भटाळी मार्गासाठी 6 कोटी रुपये, मतदारसंघातील विविध अभ्यासिकांसाठी 2 कोटी 50 लक्ष रुपये आणले यातील 6 अभ्यासिकेंचे काम प्रगतीपथावर आहे, सामाजिक सभागृहांसाठी 3 कोटी रुपये यासह इतर विकास कामांसाठी शेकडोकोटी रुपयांचा निधी आपण सरकारच्या माध्यमातुन खेचुन आणला. शहरातील कायमस्वरूपी पट्ट्यांचा मार्ग प्रगतीपथावर आहे, कामगार क्षेत्रात मोठे काम करत कामगार वर्गाला न्याय देता आला, कोरोना काळात उत्तम आरोग्यसेवा देता आली, जवळपास ऑक्सिजनसह ८०० बेड उपलब्ध करता आले. सत्तेसोबत राहण्याचा हा परिणाम आहे. अपक्ष आमदारांना इतका मोठा निधी मतदार संघात आणायचा असेल तर सत्तेची गरज असते. विकासाचा हा झंजावत पुढेही सुरु ठेवण्यासाठी एकनाथ शिंदे यांचा गट सत्तेत येणार हे लक्षात येता मी त्यांच्या गटाला समर्थन दिले आहे. हे समर्थन कोणत्या गटला नसुन चंद्रपूरच्या विकासासाठी सत्तेत येणा-याला असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले असुन विकासाच्या या मुद्दयावर चंद्रपूरची जनता माझ्या सोबत असल्याचेही त्यांनी प्रसिध्द केलेल्या प्रसिध्दी पत्रकातुन म्हटले आहे. सोबतच आपण 200 युनिट विज मोफतचा विषय सोडलेला नाही. तो सोडण्याचा प्रश्नच नाही. महाविकास आघाडीसोबत असतांनाही हा विषय आपण वारंवार उचलला आताही सत्तेसोबत राहून तिथेही हा विषय प्रखरतेने मांडणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. महाविकास आघाडी सरकार सोबत काम करतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री व इतर सहकार्यांचे मोठे सहकार्य लाभले, त्यामुळे त्यांचा आदर हा नेहमीच राहील. मात्र राजकीय परिस्थिती बदलत असतांना मतदार संघाचा अधिकाधिक विकास करण्यासाठी मी एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा देण्याचे ठरविले असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top