आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क
राजुरा -
राजुरा जेष्ठ नागरीक संघाची आमसभा 26 जुनला स्थानिक श्रीनगाजी महाराज सभागृह सभागृहात मावळते अध्यक्ष डॉ. सुरेश उपगन्लावार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेत ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षपदी सुदर्शन दाचेवार व सचिव पदावर विजय वाटेकर यांची निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणुन पुंडलिक उराडे यांनी काम पाहिले. सर्वानुमते निवड झालेल्या नवीन कार्यकारीणी पुढीलप्रमाणे आहे. अध्यक्ष सुदर्शन पांडुरंगजी दाचेवार, उपाध्यक्ष विद्याप्रकाश कल्लुरवार, सचिव विजय वाटेकर, सहसचिव रामचंद्र मुसळे, कोषाध्यक्ष मधुकर जानवे, हिशोब तपासणीस हरी डोर्लीकर, सल्लागार डॉ. सुरेश उपगन्लावार, विठ्ठलराव रागीट आणि सदस्य भास्कर येसेकर, शंकर बानकर, सुरेश तिवारी, रामचंद्र मारटकर, सुरेश बोधे, मनोहर टाके, कुर्मदास पावडे होते. यावेळी पांडुरंग चन्ने, सुभाष धामोरीकर, पुंडलीक उराडे, डॉ.अमृत गोरे, सुधाकर वाटेकर, अरविंद कल्लुरवार, गंगाधर बोबडे, मारोती आस्वले, भाऊराव खोब्रागडे यांच्यासह बहुसंख्येने मान्यवर सदस्य उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.