Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: हरदोना सोसायटीवर काँग्रेस-सेना युतीचा झेंडा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
हरदोना सोसायटीवर काँग्रेस-सेना युतीचा झेंडा अध्यक्षपदी विजय मडावी तर उपाध्यक्षपदी दिलीप लांडे आमचा विदर्भ (कार्यालय प्रतिनिधी) राजुरा - राजु...
हरदोना सोसायटीवर काँग्रेस-सेना युतीचा झेंडा
अध्यक्षपदी विजय मडावी तर उपाध्यक्षपदी दिलीप लांडे
आमचा विदर्भ (कार्यालय प्रतिनिधी)
राजुरा -
राजुरा तालुक्यातील मौजा हरदोना सोसायटीच्या आज घेण्यात आलेल्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणूकीत काँग्रेस व सेना युतीने आपला झेंडा फडकविला असून येथे अध्यक्षपदी विजय भाऊराव मडावी तर उपाध्यक्षपदी दिलीप बाबुराव लांडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या प्रसंगी हरदोना सोसायटीचे काँग्रेस - सेना युतीचे विजयी संचालक वासुदेव चाफले, मोरेश्वर पिपंळकर, दिनेश घोरपडे, महादेव भसारकर, श्यामराव आत्रण, शंकर तुमराम, देवराव तोडासे, जंगु पाटील तालांडे, जगुबाई मेश्राम, लिलाबाई पेंदोर, कमलाबाई आत्राम यांनी पाठिंबा देऊन अध्यक्ष, उपाध्यक्ष यांना बिनविरोध निवडून दिले. 
या प्रसंगी माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, जेष्ठ नेते शंकर गोणेलवार, आदिवासी नेते श्यामराव कोटनाके, जंगू येडमे, आत्माचे अध्यक्ष संतोष इंदुरवार, दिलीप डोईफोडे, अभिषेक गोरे, इर्शाद शेख, मारोती बोढेकर, संजय मेश्राम, संदीप घोटेकर, रामदास आत्राम यासह अनेकांनी आमदार सुभाष धोटे यांच्या जनसंपर्क कार्यालयात उपस्थित राहून नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व सदस्यांचा सत्कार व अभिनंदन केले आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top