Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: दोन तरुणांची दादागिरी ; महिलेच्या तक्रारीवरून प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
दोन तरुणांची दादागिरी महिलेच्या तक्रारीवरून प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स वणी - शहरातील जत्रा मैदान परिस...
दोन तरुणांची दादागिरी
महिलेच्या तक्रारीवरून प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
वणी -
शहरातील जत्रा मैदान परिसरात असलेल्या प्रेमनगर मध्ये लुटमार, मारामारी नित्याचेच झाले असून मात्र पोलिस या टपोरी युवकांवर कारवाई करतांना दिसून येत नाही. परिणामी लुटमार, मारामारी सारख्या घटनेत दिवसागणिक वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.
विदर्भात प्रसिद्ध असलेल्या शहरातील प्रेमनगर परीसरात हवसे नवसे गवसे, आंबट शौकीन मोठ्या प्रमाणात फेरफटका मारायला येतात. याचाच फायदा घेऊन या परीसरातील काही टपोरी युवक सदर परीसरात दबा धरुन बसतात व अनोळखी असलेल्यांना धमकावून त्यांना मारहाण करून त्यांच्याकडील रोख रक्कम, मोबाईल व किंमती साहित्य घेऊन पोबारा करतात. तसेच झेंडीमुंडी, तिन पत्ते सारखे खेळ या परीसरात येणाऱ्या लोकांना लुटण्यासाठी राहतात यातुनच मारामारी सारख्या घटना घडतात. असे अनेक घटनांवरून दिसून आले. परंतु याकडे पोलीसांचे दुर्लक्ष असल्याने मारामारी व लुटमारीच्या घटनेत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे बदनामीच्या भिती पोटी अशा घटनेच्या तक्रारी करण्यात येत नाही.
शनिवारी दोन युवकांनी तेथील एका महिलेच्या घरासमोरील बल्ब फोडून जिवे मारण्याची धमकी दिल्याने तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी त्या दोन युवकांविरुद्ध प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल केले आहे.
रंगनाथ नगर परीसरातील साहिल व बादल या दोन तरुणांनी प्रेमनगर मध्ये दादागिरी सुरू केली असुन शनिवारी रात्री ८ वाजता चे सुमारास एका इसमासोबत दादागिरी करून त्याला धमकावत होते. त्यावेळी तेथील एक महिला घरासमोर बसुन असतांना तिला हा प्रकार दिसून येतात तिने मध्यस्थी करून वाद सोडविण्यासाठी प्रयत्न केला परंतु साहिल व बादल ने तिलाही धमकावले व तीच्या घरासमोरील बल्ब फोडून तिला जिवाने मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी त्या महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी त्या दोन युवकांविरुद्ध प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल केले आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top