Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: पतीने पोस्टाने पाठवला पत्नीला तलाकनामा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
पतीने पोस्टाने पाठवला पत्नीला तलाकनामा धक्कादायक प्रकार ; आठ जणांविरोधात गुन्हा दाखल आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स औरंगाबाद - तोंडी किंवा न...
पतीने पोस्टाने पाठवला पत्नीला तलाकनामा
धक्कादायक प्रकार ; आठ जणांविरोधात गुन्हा दाखल
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
औरंगाबाद -
तोंडी किंवा न्यायालयाच्या आदेशाने घटस्फोट झाल्याचे तुम्ही ऐकले आहे. मात्र, औरंगाबादेत एका व्यक्तीने चक्क तलाक, तलाक, तलाक असे तीन वेळा लिहून आपल्या पत्नीला पोस्टाने तलाकनामा पाठविल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पिडितेच्या फिर्यादीवरून आठ जणांविरोधात विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लग्नात अपेक्षेप्रमाणे हुंडा दिला नाही तसचं घरात राहण्याची लायकी नसल्याचे सांगून, वडिलांकडून २ लाख रूपये घेऊन ये, अशी मागणी करून विवाहितेचा छळ करण्यात येत होता. या छळानंतर विवाहित महिला माहेरी आली होती. त्यानंतर विवाहितेच्या पतीने लेखी पोस्टाने तलाकनामा पाठवून तिहेरी तलाक दिला आहे.
याप्रकरणी विवाहितेच्या तक्रारीवरून तलाक देणाऱ्या पती सरफराज सिकंदर यांच्यासह सासरच्या अन्य आठ जणांच्या विरोधात एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top