Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: आरोग्य शिबीर जनतेपर्यंत पोहचविण्याचे उत्तम माध्यम - डॉ. किरण देशपांडे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आरोग्य शिबीर जनतेपर्यंत पोहचविण्याचे उत्तम माध्यम - डॉ. किरण देशपांडे पुर्व मंडळात भाजपाचे निःशुल्क रोगनिदान आरोग्य शिबीर संपन्न शशी ठक्कर -...
आरोग्य शिबीर जनतेपर्यंत पोहचविण्याचे उत्तम माध्यम - डॉ. किरण देशपांडे
पुर्व मंडळात भाजपाचे निःशुल्क रोगनिदान आरोग्य शिबीर संपन्न
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने ऐतिहासिक आठ वर्ष पुर्ण केल्या निमित्याने सेवा सुशासन व गरीब कल्याण अभियान संपूर्ण देशात राबविण्यात येत आहे. त्या पंधरवाडा निमित्त महाराष्ट्र विधिमंडळ लोकलेखा समिती प्रमुख  आ. सुधीर मुनगंटीवार व महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या मार्गदर्शनात भारतीय जनता पार्टीच्या वतीने जनसामान्यांच्या समृद्धीसाठी, कल्याणसाठी सेवा समर्पणाच्या भावनेने पुर्वमंडळातील बंगाली कॅम्प येथील कृष्ण नगर एम. बी. कॉन्व्हेन्ट येथे निःशुल्क आरोग्य रोगनिदान शिबीर घेण्यात आले. सदर आरोग्य रोगनिदान शिबीरामध्ये मुख रोग, किडनी रोग, हायड्रोसील, दंत रोग, कान, नाक, घसा यासारख्या रोगांची निःशुल्क  तपासणी करून औषधपचार उपलब्ध करून देण्यात आले सदर कार्यक्रमात भारतीय जनता पार्टी महानगर वैदकिय आघाडी जिल्हाध्यक्ष डॉ.किरण देशपांडे यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की आरोग्य रोगनिदान शिबिर हे जनतेपर्यंत  पोहचविण्याचे उत्तम माध्यम असून सेवा व समर्पणाची भावना रुजविण्याचे चांगले साधन असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले सदर आरोग्य रोगनिदान शिबीरात संघटन महामंत्री राजेंद्र गांधी,पूर्व  मंडळ अध्यक्ष दिनकर सोमलकर,डॉ. अमोल पोद्दार, डॉ. मंगेश टिपणीस, डॉ. गुंडावार, डॉ. ममता, मंडळ महामंत्री रामजी हरणे, बलराम शहा, अनु.जमाती मोर्चा महानगर अध्यक्ष धनराज कोवे, अनु.जाती मोर्चा अध्यक्ष धम्मप्रकाश भस्मे, वर्षा सोमलकर, संजय पटले, कविता सरकार, माजी नगरसेविका चंद्रकला सोयाम, वंदना जांभुळकर, जयश्री जुमडे,प्रलय सरकार, रेखा मडावी, अॅड. सारिका सन्दुरकर, निलिमा आत्राम उपस्थित होते. 

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top