Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: मोठी बातमी : एकाच कुटुंबातील ९ जणांची विष प्राशन करुन आत्महत्या
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
मोठी बातमी : एकाच कुटुंबातील ९ जणांची विष प्राशन करुन आत्महत्या आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स सांगली - मिरज तालुक्यातील म्हैसाळ या गावी राह...
मोठी बातमी : एकाच कुटुंबातील ९ जणांची विष प्राशन करुन आत्महत्या
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
सांगली -
मिरज तालुक्यातील म्हैसाळ या गावी राहत असलेल्या डॉक्टर माणिक यल्लाप्पा वनमोरे यांच्या कुटुंबातील आठ ते नऊ जणांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली आहे.आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजले नाही.घटनास्थळी मिरज ग्रामीण पोलिस व ग्रामस्थांनी गर्दी केली आहे.या घटनेमुळे संपूर्ण मिरज तालुक्यात आणि सांगली जिल्ह्यात खळबळ माजली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार सदर कुटुंबाने कर्जबाजारीपणामुळे सामूहिक आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला आहे. आत्महत्या केलेल्या मध्ये पोपट यल्लाप्पा वनमोरे वय वर्षे ५२,संगीता पोपट वनमोरे वय वर्ष २८, अर्चना पोपट वनमोरे वय वर्षे ३०,शुभम पोपट वनमोरे वय वर्षे २८,माणिक यल्लाप्पा वनमोरे वय वर्षे ४९,रेखा माणिक वनमोरे वय वर्षे ४५,आदित्य माणिक वनमोरे वय वर्षे १५,अनिता माणिक वनमोरे वय वर्षे २८ आणि आक्काताई वनमोरे वय वर्षे ७२ अशा नऊ जणांनी विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
घटनास्थळीवरुन मिळालेली माहिती अशी की म्हैसाळ येथील नरवाड रोड जवळ असलेल्या अंबिका नगर चौक अलगत डॉक्टर वनमोरे कुटुंब राहत होते. अंबिका नगर मध्ये या कुटुंबाचे अजून एक घर आहे. आज सकाळपासून दोन्ही घराचा दरवाजा उघडा नव्हता. आसपासच्या शेजाऱ्यांनी घराचा दरवाजा उघडून पाहिले असता. एकाच घरात सहा जणांनी विष घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. तर दुसऱ्या घरात तिघांचे मृतदेह आढळून आले.
एकाच कुटुंबातील नोकरणी विष प्राशन करून आत्महत्या केल्याचे समोर आले. येथील रहिवाशांनी मिरज ग्रामीण पोलिसांना माहिती दिली आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top