Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: अंगणवाडी सेविका श्रीमती शोभा दत्तू दरेकर यांचा सेवानिवृत्त सत्कार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अंगणवाडी सेविका श्रीमती शोभा दत्तू दरेकर यांचा सेवानिवृत्त सत्कार आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स राजुरा - अंगणवाडी सेविका म्हणून सेवा पुर्ण ...
  • अंगणवाडी सेविका श्रीमती शोभा दत्तू दरेकर यांचा सेवानिवृत्त सत्कार
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
अंगणवाडी सेविका म्हणून सेवा पुर्ण केल्याबददल श्रीमती शोभा दत्तु दरेकर यांचा राजुरा तालुका अंगणवाडी पर्यवेक्षिका केंद्र वरोडा, धिडशी, कढोली व गोवरी यांच्या संयुक्त विद्यमाने गोवरी येथील हनुमान मंदिर सभागृहात एका कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिप माजी बांधकाम सभापती सुनिल उरकुडे, सौ प्रेमीला काकडे उपस्थित होते. 
पाहुण्यांच्या हस्ते श्रीमती शोभा दत्तु दरेकर यांनी अंगणवाडी सेविका म्हणून सेवा पुर्ण केल्याबददल त्यांचा शाल, श्रीफळ व साडीचोळी देऊन सत्कार करण्यात आला. सौ. प्रेमिला काकडे म्हणाल्या की शोभाताई म्हणजे मनमिळाऊ शांत स्वभाव, साधी राहणी व अतिशय श्रम करणारी व कष्टालाच परमेश्र्वर माणणारी आहे. 
मा. सुनिल उरकुडे म्हणाले की मी दोन पंचवार्षीक मध्ये सरपंच म्हणून काम पाहत असतांना शोभाबाईनी आपल्या कर्तुत्वाने गावातील लहान मुलांना चांगले संस्कार देवून घडविले आपल्या पतीच्या निधना नंतर खंबीरपणे उभ्या राहून परिवार घडविला. साधी राहणी, निंदा न कवनासी, अपुले दुःख न वदे कुणाला' चिंता इतराची या राष्ट्रसंतांच्या शब्दाला साजेस व्यक्तीमत्व ठरलेली शोभाबाई. सौ. ज्योती दरेकर म्हणाल्या की, अतीशय तारूण्यात शोभाकाकुचे पती वारल्यानंतर त्यांनी जी परिस्थीती भोगली व परिवार घडविला त्यापासुन सर्व महिलांनी आदर्श घ्यावा तसेच गावासाठी नेमुन दिलेल्या कार्याला साजेस कार्य काकुंनी केले. सौ.संध्या ढवळे म्हणाल्या की, शोभाबाई खंबीरपणे उभी राहून आपल्या मुलींना D.Ed, MA-BEd शिकविले. त्यांना शिक्षिका बनविल्या. आज त्या उत्कृष्ट कवियत्री आहे.
मा. संजय चिडे म्हणाले की, शोभा काकुंनी मातृत्व, पितृत्व व दातृत्व या तिनही जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळून आपल्या अंगणवाडीतील मुलांना घडविले त्याच्या या कार्याची पावती म्हणुन त्यांना उत्कृष्ठ अंगणवाडी सेविका पुरस्कार 2015-2016 मध्ये देऊन सन्मान करण्यात आला. हरिदासजी बोरकुडे यांचे वडील स्व. झित्राजी बोरकुटे यांनी शोभाबाई दरेकर यांना अंगणवाडी सेविका म्हणुन रुजु करण्यासाठी अतिशय मोलाचा सहभाग असल्याची कबुली सौ. ज्योती बंडु  पोतले यांनी व्यक्त केली. यावेळी लहु दत्तू दरेकर, बंडु नथ्थूजी पोतले, श्रीमती मीना विनोद दरेकर, सुचिता देठे, सौ. मनिषा पडवेकर, सौ. झाडे मॅडम व शेकडो लोक उपस्थित होते. प्रास्ताविक सौ. ज्योती बंडु पोतले, सुत्रसंचालन शंकर दरेकर तर आभार संजय चिडे यांनी मानले. 

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top