Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: चुनाळा येथे विहिरीत आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
चुनाळा येथे विहिरीत आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स राजुरा - राजुरा तालुक्यातील चुनाळा येथील सदाशिव वडस्कर यांच्या...
  • चुनाळा येथे विहिरीत आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
राजुरा तालुक्यातील चुनाळा येथील सदाशिव वडस्कर यांच्या विहिरीत एका अनोळखी इसमाचे प्रेत आढळून आले. दोन-तीन दिवसांपूर्वी हा व्यक्ती पाण्यात पडला असावा, असा त्याच्या शरिराच्या अवस्थेवरून अंदाज व्यक्त करण्यात येत असून या व्यक्तीने आत्महत्या केली की, त्याला इथे मारून टाकण्यात आले, याविषयी शंका व्यक्त करण्यात येत आहे. दिनांक 6 जूनला चुनाळा येथील सदाशिव वडस्कर यांच्या शेतातील विहिरीत प्रेत तरंगत असल्याचे दिसले. शेतमालकाला हे निदर्शनास येताच त्याने राजुरा पोलिसांना माहिती दिली. राजुरा पोलिसांनी नोंद घेत प्रेत विहिरी बाहेर काढले. या युवकाचे वय अंदाजे 26 वर्ष असावे, असा अंदाज आहे. प्रेताचे अंगावर फक्त अंतर्वस्त्र होते आणि प्रेताच्या कंबरेला दोर व टिनाचा पिपा बांधून होता आणि प्रेताचा दोर हा विहिरीचे बाहेर बांधून होता. प्रेत बाहेर काढल्यानंतर गळलेल्या अवस्थेत होते. या प्रकारामुळे हा हत्येचा प्रकार आहे. की त्याने आत्महत्या केली, याबद्दल संशय निर्माण झाला आहे. हा युवक नेमका कोण आहे, पोलिसांपुढे आव्हान असून राजुरा पोलिस हे प्रकरण कसे उघडकीस आणते, याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top