Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: वेकोलि कामगाराची आत्महत्या
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
वेकोलि कामगाराची आत्महत्या आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स राजुरा - तालुक्यातील रामपूर येथे शंकर मोहितकर वय 53 वर्षे यांनी आपल्या राहत्या घरी...
  • वेकोलि कामगाराची आत्महत्या
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
तालुक्यातील रामपूर येथे शंकर मोहितकर वय 53 वर्षे यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी घडली. राजुरा शहरालगत असलेल्या रामपूर येथील शंकर मोहितकर हे वेकोलिमध्ये पोवनी डीप येथे मजूर म्हणून कार्यरत होते. त्यांचे कुटुंबीय कार्यक्रमाकरिता बाहेरगावी गेले होते. शंकर मोहितकर हे एकटेच घरी होते. घरी कुणीही नसताना त्यांनी पहाटे गळफास घेऊन आत्महत्या केली. ही बाब शेजाऱ्यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा केला. याच्या पश्चात मुलगा व पत्नी आहे. पोलिसांनी घटनेची नोंद घेतली.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top