Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: युवा प्रतिष्ठान कोरपना यांनी बालकाच्या जबड्याच्या शस्त्रक्रियेसाठी दिला मदतीचा हात
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
युवा प्रतिष्ठान कोरपना यांनी बालकाच्या जबड्याच्या शस्त्रक्रियेसाठी दिला मदतीचा हात  उपचाराची व्यवस्था करून घडविले माणुसकीचे दर्शन युवा प्रति...

  • युवा प्रतिष्ठान कोरपना यांनी बालकाच्या जबड्याच्या शस्त्रक्रियेसाठी दिला मदतीचा हात 
  • उपचाराची व्यवस्था करून घडविले माणुसकीचे दर्शन
  • युवा प्रतिष्ठान कोरपना चे अध्यक्ष नितीन वि. बावने यांच्या पुढाकार
  • युवा प्रतिष्ठान तर्फे दिली तीस हजारा रुपयांची आर्थिक मदत
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
कोरपना -
नगरपंचायत मधील वार्ड क्रमांक ११ मधील रहिवासी असलेले ज्येष्ठ नागरिक तुळशीरामजी डोहे यांच्या इंद्रजित निवृत्ती डोहे नामक नातवाचा जन्मतःच जबड्याचा त्रास होता. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे पैश्याची व्यवस्था करून रुग्णालयात उपचारासाठी नेण्याचे तुळशीरामजी डोहे यांचे मानस होते. आर्थिक महामंदीच्या आणि कोविड-१९ मध्ये सर्व कामधंदे बंद झाल्यामुळे तसेच थोडीही शेतजमीननसल्या मुळे दोन पैसे स्वतः जवळ येण्याऐवजी कर्जाचा बोजाच अंगावर बसत असल्यामुळे इंद्रजीत च्या शस्त्रक्रियेकडे दुर्लक्ष झाले आणि त्याच अवधीत  इंद्रजीतचा जबडा पूर्णतः उघडेनासा झाला.
तुळशीरामजिच्या कुटूंबियांनी इंद्रजितला सावंगी (मेघे) येथील रुग्णालयात उपचारासाठी नेले.सावंगी (मेघे) येथिल डॉक्टरांनी इंद्रजितला शस्त्रक्रियेशीवाय पर्याय नसल्याचे सांगितले आणि ऑपरेशनचा अंदाजे खर्च सांगितला. पैश्याची सोय नसल्यामुळे तुळशीरामजी डोहे यांनी नातवाला रुग्णालयातुन घरी आणले. सदर बाब युवा प्रतिष्ठान कोरपना चे अध्यक्ष नितीन वि. बावने व प्रफुल मालेकर व युवा प्रतिष्ठान च्या सदस्यांना लक्षात येता गरजू-निराधार आणि आरोग्यासाठी मदत करणाऱ्या युवा प्रतिष्ठानच्या धडाडीच्या कार्यक्रर्तानी तात्काळ शस्त्रक्रियेसाठी ३००००/- ( तिस हजार ) रुपयांची मदत गोळा करुन तुळशीरामजी डोहे यांच्या कडे इंद्रजित च्या शस्त्रक्रियेसाठी नेऊन दिली व मानुसकीचे     
दर्शन घडविले. 
यापूर्वीही युवा प्रतिष्ठान तर्फे गावातील रुग्ण निराधार अशा गरजू व्यक्तींना नेहमी मदत करण्यात आली आहे व यापुढेही गरजू निराधार व्यक्ती व विद्यार्थी मित्रांच्या मदतीकरिता नेहमी सदैव तत्पर राहू अशी ग्वाही युवा प्रतिष्ठान कोरपना तर्फे नितीन वि. बावने व सर्व सदस्यांनाच दिली.
इंद्रजीतला आर्थिक मदत करण्यासाठी युवा प्रतिष्ठान चे अध्यक्ष नितीन बावणे, प्रफुल्ल मालेकर, उपेंद्र मालेकर, किशोर आस्वले, संकेत राऊत, इतियाज भाई, प्रतीक डोंगे, अमोल लोडे, विक्की भोयर, धवल गिरडकर, अनुराग ठावरी, शुभम इटनकर, छोटू पायघन, हर्षल डोंगे, इरफान भाई, सूरज खोबरकर, श्रीकांत लोडे, आशिष मेश्राम व विनायक ठाकरे आदींनी परिश्रम घेऊन मदत निधी गोळा करून इंद्रजीत यांच्या घरी त्यांच्याकडे  शस्त्रक्रियेकरिता नेऊन दिले. तसेच तब्बेत बरी होणेबाबत शुभेच्छा व्यक्त केल्यात असे युवा प्रतिष्ठान चे अध्यक्ष नितीन बावणे यांनी सांगितले.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top