Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: उन्हाळी शिबिरात वर्ग 1 ते 5 चे 240 विद्यार्थी झाले सहभागी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
उन्हाळी शिबिरात वर्ग 1 ते 5 चे 240 विद्यार्थी झाले सहभागी 14 मे ला होणार शिबिराचा समारोप आदित्य बिर्ला पब्लिक स्कुल, गडचांदूर येथे उन्हाळी श...

  • उन्हाळी शिबिरात वर्ग 1 ते 5 चे 240 विद्यार्थी झाले सहभागी
  • 14 मे ला होणार शिबिराचा समारोप
  • आदित्य बिर्ला पब्लिक स्कुल, गडचांदूर येथे उन्हाळी शिबिराला उत्साहात प्रारंभ
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदुर -
आदित्य बिर्ला पब्लिक स्कुल, गडचांदूर येथे उन्हाळी शिबिराला उत्साहात प्रारंभ झाला. 4 मे ला सुरु झालेल्या शिबिराचा समारोप 14 मे ला होणार आहेत.
या शिबिरात वर्ग 1 ते 5 चे एकूण 240 विद्यार्थी सहभागी झाले आहेत. विद्यार्थ्यांचा शारीरिक व मानसिक विकास व्हावा या मुख्य उद्देशाने या शिबिरात विविध प्रकारच्या स्पर्धा, क्रिडा स्पर्धा चे आयोजन करण्यात आले आहेत. प्राचार्या अर्चना गोलचा यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहेत. शाळा व्यवस्थापन समिती च्या अधिकाऱ्यांनी या शिबिराला भेट देऊन सर्व लहान मुलांना शुभेच्छा दिल्या.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top