एच.एन. (राजेश) अरोरा - आमचा विदर्भ प्रतिनिधी
बल्लारपूर -
तालुक्यातील गिलबिली ग्रामपंचायतीची महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत दशवार्षिक सूक्ष्म नियोजन आराखड्याकरिता निवड करण्यात आली आहे. या विकास आराखड्यातून गिलबिली ग्रामपंचायत एक विकासाचे मॉडेल ठरणार आहे.याकरिता नरेगा सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, तांत्रिक सहाय्यक व रोजगार सेवकांची चमु मुक्कामी राहून विकास आराखडा तयार करणार आहे.
सदर प्रक्रिया अधिक प्रभावीपणे होण्याकरिता संजय राइंचवार, तहसीलदार बल्लारपूर, किरणकुमार धनवाडे, गट विकास अधिकारी, पं.स. बल्लारपूर यांनी पहिल्या दिवशी सभा घेऊन उपस्थितीर सर्वांना मार्गदर्शन केले.
गिलबिली ग्राम पंचायतीतील आसेगाव, मोहाडी, गिलबिली गावातील प्रत्येक कुटुंबाचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. कुटुंबाचा मागणीनुसार योजनेतील अनुदेय 262 कामांपैकी पाहिजे त्या वैयक्तिक कामांची मागणी नोंदविण्यात आली आहे. यानंतर तिन्ही गावाचे शिवार फेरी, गाव फेरी काढण्यात येणार आहे. त्याद्वारे सार्वजनिक जलसंधारण कामांचे नियोजन करण्यात येणार आहे. तसेच वन विभाग व वैयक्तिक जमिनीवर वृक्ष लागवड, तलावातील गाढ काढणे, बोडी खोलीकरण, मजगी, शेततळे या कामांचा समावेश करण्यात येणार आहे. गावकऱ्यांचा माध्यमातून सिमेंट रस्ते, सामूहिक शोषखड्डे, नॅडेप टाके बांधकाम, गुरांचा गोठा, सार्वजनिक गोडाऊन, बचत गटांच्या महिला करिता इमारत तसेच शाळा अंगणवाडी करिता भौतिक विकासाची कामे मोठ्या प्रमाणात नियोजनात घेण्यात येणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.