Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: तहसील कार्यालयाजवळ बजरंग दल द्वारे पाणपोईचे लोकार्पण
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
तहसील कार्यालयाजवळ बजरंग दल द्वारे पाणपोईचे लोकार्पण आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स राजुरा - रणरणत्या उन्हात मन आणि शरीर दोन्ही तृप्त करते त...

  • तहसील कार्यालयाजवळ बजरंग दल द्वारे पाणपोईचे लोकार्पण
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
रणरणत्या उन्हात मन आणि शरीर दोन्ही तृप्त करते ते फक्त थंड पाणी,  जलसेवा हीच मोठी ईश्वर सेवा या ध्येयाने प्रेरीत होऊन बजरंग दल, राजुराच्या कार्यकर्त्यांनी आज भगवान परशुराम जयंती व अक्षयतृतीयाच्या मुहूर्तावर सामाजिक दायित्वाची जाण ठेवत तहसील कार्यालय पाणपोई चे लोकार्पण करण्यात आले.  
याप्रसंगी शेतकरी, शेतमजूर व प्रकल्पग्रस्तांसाठी संघर्ष करणारे भाजपाचे तालुका महामंत्री प्रशांत घरोटे, मनोहर आईटलावर, किशोर शेंडे, कैलाश कार्लेकर, राजु डोहे, नितीन पिपरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता विश्व हिंदु परिषदचे रुपेश भाकरे, नामदेव उरकुडे, तसेच बजरंग दलाचे अंकुश घतोळे, प्रफुल घोटेकर, व्यंकटेश कदम, आकाश वाढई, अनिल पवार, आश्विन बनकर, जयपाल ठाकूर, शुभम ठाकरे, मृणाल भाके, ऋषेकेश देशपांडे, शुभम बुटले, अभिषेक घतोले, गुरुदेव, शिवकुमार कुक्षिकांत, श्रीकांत रेक्कलवार, देवा खंडाळे, अंकुश घुबडे आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top