धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
कोरपना -
कोरपना तालुका होऊन आज बरीच वर्षे झाले परंतु याठिकाणी साधा प्रवासी निवारा नाही. दररोज तालुक्याच्या ठिकाणी विविध कामांकरिता हजारो नागरिक येत असतात परंतु कोरपना चौकांमध्ये पान टपरी हॉटेल दुकान यांचा आसरा घेऊन नागरिकांना बस ची वाट पाहत ताटकळत उभे राहावे लागते.
सध्याच्या कडक उन्हाळ्या सोबतच पावसाळ्यात ही वारा पाणी यांचा सामना करावा लागतो. आज या तालुक्यातील नागरिक अजूनही प्रवासी निवारा च्या प्रतीक्षेत आहेत. या विधानसभेतील आमदार यांनी सामान्य नागरिकांच्या समस्येची जाण लक्षात घेऊन कोरपना तालुक्याच्या ठिकाणी प्रवासी निवारा देण्यात यावा अशी मागणी भाजपा तालुका अध्यक्ष नारायण हिवरकर यांनी केली आहे. कोरपना शहरातच नव्हे तर परसोडा गोविंदपुर, दूरगाडी, महेंदी, कोठोडा, पारडी, चोपण, कान्हाळगाव, भोपळा, वनसडी, धामणगाव, नारांडा, आसन इंजापूर आदी गावातील बसस्थानकांवर सुद्धा प्रवासी निवाऱ्याची व्यवस्था करण्यात यावीत अशी मागणी हिवरकर यांनी केली. जनतेच्या प्रश्नाकडे वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने कोरपना तालुक्यातील नागरिकांत संतापाचे वातावरण आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.