Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: 12 मे ला जेष्ठ नागरिकांनसाठी निःशुल्क नाडीपरीक्षा शिबीर
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
जेष्ठ नागरिकांनसाठी निःशुल्क नाडीपरीक्षा शिबीर 12 मे ला आयोजन जेष्ठांना नाव नोंदविण्याचे आवाहन शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपूर - ...

  • जेष्ठ नागरिकांनसाठी निःशुल्क नाडीपरीक्षा शिबीर
  • 12 मे ला आयोजन जेष्ठांना नाव नोंदविण्याचे आवाहन
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
आर्ट ऑफ लिविंग या अंतरराष्ट्रीय संस्थेचे प्रणेते श्री श्री रविशंकरजी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून 12 मे ला मिलिंद गंपावार व वैद्यराज अभिषेक पाठक यांचे संयुक्त प्रयत्नाने 60 वर्षावरील जेष्ठ नागरिकांकरिता निःशुल्क नाडीपरीक्षा आयोजित करण्यात आली असून गरजूंनी भालचंद्र मेडिकल पठाणपुरा चंद्रपूर येथे 12 मे ला सकाळी 8 ते 4 वाजेपर्यंत शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

नाडी परीक्षणाचे फायदे
  • नाडी परीक्षण हे प्राचीन तंत्र आहे ज्यामध्यामातून रोगाच्या मुळाशी जाता येते.
  • नाडी परीक्षेद्वारे जीवन शांत व स्वस्थ राहते. 
  • नाडी परीक्षा ही रोग निदानाची एक प्रभावशाली, किफायती आणि हानीविरहित पद्धती आहे. 
  • ही पद्धती फक्त रोगाच्या मुळापर्यंतच जात नाही तर, संभाव्य धोक्यांची/आजारांची कल्पना सुद्धा देते. 
  • नाडी परीक्षणाने जाणून घ्या तुमची प्रकृती कोणती आहे? वात, पित्त की कफ?
  • प्रकृतीनुरूप विकृती होऊ नये म्हणून काय खावे? काय खाऊ नये यावर समुपदेशन
  • नाडी परीक्षणाच्या मदतीने वात, पित्त, कफ हे बॅलन्स करू शकतो
  • सर्दी
  • डोकेदुखी
  • सांधेदुखी
  • पचनाच्या समस्या
  • सर्व प्रकारच्या ऍलर्जी
  • तणाव, अनिद्रा
  • रक्तदाब
  • कमी / जास्त वजन
  • डायबेटीज
  • हृदयविकार
  • महिलांच्या समस्या
नाडी परीक्षण हे उपाशीपोटी केले जाते अथवा नाडी तापसण्याआधी किमान 3 तास अगोदर काहीही खाऊन-पिऊन येऊ नये तसेच येण्यापूर्वी वेळेची नोंदणी करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top