Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: १ मे रोजी विदर्भ राज्य आंदोलन समितीने पाळला "काळा-विश्वासघात दिवस"
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
१ मे रोजी विदर्भ राज्य आंदोलन समितीने पाळला "काळा-विश्वासघात दिवस"  चंद्रपूर येथे ॲड. वामनराव चटप यांचेसह कार्यकर्ते स्थानबद्ध ६ त...

  • १ मे रोजी विदर्भ राज्य आंदोलन समितीने पाळला "काळा-विश्वासघात दिवस" 
  • चंद्रपूर येथे ॲड. वामनराव चटप यांचेसह कार्यकर्ते स्थानबद्ध
  • ६ तालुक्यात विदर्भाचे स्टिकर लावले सरकारी कार्यालयांवर
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
चंद्रपूर -    
विदर्भ राज्य आंदोलन समितीने दिनांक १ मे २०२२ हा महाराष्ट्राने विदर्भातील जनतेचा विश्वासघात केला म्हणुन काळा दिवस पाळण्याचे आंदोलन घोषीत केल्याप्रमाणे चंद्रपूर जिल्ह्यातील सहा तालुक्यात कार्यकर्त्यांनी स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करावे अशा जोरदार घोषणा देत शासकीय कार्यालया समोरील फलकावर महाराष्ट्र मिटवून त्याठिकाणी विदर्भाचे स्टिकर लावले. या प्रकरणी चंद्रपूर येथे शासकीय विश्रामगृह परिसरातून समीतीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन रामनगर पोलीस ठाण्यात स्थानबद्ध करण्यात आले.
१ मे ला सकाळी ११ वाजता विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांच्या नेतृत्वात शासकिय सिंचन विभागाच्या कार्यालय परिसरातील फलकांना महाराष्ट्र लिहिलेल्या जागेवर "विदर्भ" लावलेले स्टिकर चिपकविणे सुरू केले. काही ठिकाणी घोषणा देत हे स्टिकर लावल्यानंतर पोलिसांनी मज्जाव करीत सर्व आंदोलकांना ताब्यात घेऊन रामनगर पोलीस ठाण्यात स्थानबद्ध केले. यावेळी माजी आमदार ॲड.चटप यांनी सरकारच्या दडपशाहीचा निषेध केला. या आंदोलनाचे नेतृत्व विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष ॲड.वामनराव चटप, अंकुश वाघमारे, अनिल दिकोंडवार, मुन्ना आवळे, गोपी मित्रा, मारोतराव बोथले, किशोर दांडेकर, अरुण सातपुते, गोठे, पपिता जुनघरे यांनी केले.  
राजुरा येथे आज सकाळी ८ वाजता समिती आणि मॉर्निंग क्लबचे पदाधिकारी व सदस्य संविधान चौकात जमले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मालार्पण केले. यानंतर स्वतंत्र विदर्भ झालाच पाहिजे, अशा जोरदार घोषणा देत रस्त्यावरील अनेक चारचाकी व दुचाकींना विदर्भाचे स्टिकर लावले. येथे आंदोलनाचे नेतृत्व जेष्ठ विधिज्ञ ॲड. अरुण मु. धोटे यांनी केले. या आंदोलनात व्यापारी संघाचे माजी अध्यक्ष प्रशांत गुंडावार, आशुतोष चटप, दिनकर डोहे, कुर्मदास पावडे, अजय बदकमवार, विनायक कल्लुरवार, चरणदास नगराळे यांचेसह मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले. यानंतर ११ वाजता राजुरा शहरातील अनेक शासकिय कार्यालयातील महाराष्ट्र लिहिलेल्या ठिकाणी विदर्भाचे स्टिकर लावून राजुरा शहर विदर्भमय करून टाकले. या आंदोलनाचे नेतृत्व जेष्ठ विधिज्ञ ॲड. मुरलीधर देवाळकर, माजी नगराध्यक्ष रमेश नळे, पूर्व विदर्भ अध्यक्ष कपिल इद्दे, माजी बाजार समिती सभापती प्रभाकर ढवस, दिनकर डोहे, शेषराव बोंडे, मारोती येरणे, बळीराम खुजे, नगरसेवक दिलीप डेरकर, मधुकर चिंचोलकर, भाऊजी कन्नाके, माजी पं.स. सदस्य बंडू कोडपे, राहुल बानकर, मधुकर जानवे, राहुल बानकर, विलास कोदिरपाल, सुरज गव्हाणे, वैभव अडवे, उत्पल गोरे, देवानंद भांडारकर, शौकत भाई, अझर हुसेन, अशोक भगत, गणेश काळे, प्रकाश लोनगाडगे,भगवान गारघाटे, विजय मिलमिले यांनी केले. येथे मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले.
कोरपणा येथे महाराष्ट्र मिटाओ - विदर्भ मिलाओ या आंदोलनात अरुण पाटील नवले,अविनाश मुसळे, बंडू पाटील राजूरकर, सुभाष तुरानकर, गजानन परिवार मोहब्बत खान, ॲड. श्रीनिवास मुसळे, गजानन चौधरी, वासेकर पाटील, सुनील बामणे, गजानन बेरड, सचिन मोहितकर, नदिर कादरी, काशिनाथ पाचभाई, शारीरिक सय्यद, अंकुश काळे, पद्माकर मोहितकर, गजानन राजूरकर यांच्यासह विदर्भवादी कार्यकर्ते आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले. यावेळी स्वतंत्र विदर्भाच्या जोरदार घोषणांनी कोरपना गाव दणाणून गेले. जिवती येथे समितीचे पदाधिकारी सुदाम राठोड, शब्बीर जागीरदार, नरसिंह हामने, जीवन तोगरे, देविदास पवार, अरविंद चव्हाण, विनोद पवार यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. येथे शासकिय कार्यालये, गाड्या यांच्या महाराष्ट्राच्या फलकावर विदर्भाचे स्टिकर लावून विदर्भ राज्याचा गजर केला.
गोंडपिपरी येथे आंदोलनाचे नेतृत्व डॉ.संजय लोहे, डॉ.अशोक कुडे, ॲड. प्रफुल्ल आस्वले, ॲड.रुपेश सुर, अंकुर मल्लेलवार, शंकर पाल, आनंद खर्डीवार, गणेश पिंपलशेंडे यांनी केले. येथे शासकिय कार्यालये व गाड्यांवर विदर्भ राज्याचे स्टिकर लावण्यात आले. भद्रावती येथे सुधीर सातपुते, राजु बोरकर, प्रकाश आस्वले, संतोष रामटेके, वामन मत्ते, मंगेश नाकाडे, भाऊराव मत्ते, जगन दानव, होकम यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. येथे कार्यकर्त्यांनी विदर्भ राज्याचे स्टिकर लावून विदर्भ राज्याचा गजर केला.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top