- बाजारात जम बसवायचा असेल तर मालाची गुणवत्ता व दर्जा टिकवणे आवश्यक - संजय राईंचवार
- उमेद बल्लारपूर मार्फत तालुकास्तरीय विक्री केंद्र कॉफ शॉप व कॅंटीनचे तहसीलदार संजय राईंचवार यांचे हस्ते उदघाटन
एच.एन. (राजेश) अरोरा - आमचा विदर्भ प्रतिनिधी
बल्लारपूर -
ग्रामीण भागातील महिलांच्या हाताला रोजगार मिळावा व त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने महाजीविका अभियान आजीविका वर्षाचे औचित्य साधून तहसील कार्यालयाच्या प्रांगणात भूमिअभिलेख कार्यालय जवळ महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान कक्ष पंचायत समिति बल्लारपूरच्या माध्यमातून विश्वास व प्रथम महिला प्रभाग संघाच्यावतीने महिलासमुहाद्वारे उत्पादित विविध वस्तूंचे विक्रीकेंद्र व कॅन्टीन चे उदघाटन तहसीलदार संजय राईंचवार यांचे हस्ते करण्यात आले, सदर तालुकास्तरीय केंद्रात विविध स्वयंसहायता गटाचे उत्पादने जसे की आरोग्यास लाभदायक काळे तांदूळ, सर्दी खोकल्यावर गुणकारी औषधीयुक्त अद्रक वडी, कोठारी ची ओळख असलेले शुद्ध मिरची पावडर तसेच हळद पावडर व विविध प्रकारचे मसाले चविस तथा आरोग्यास उपयुक्त मशरूम, फणस, करवंद, मिरची, हळदीचे लोणचे, इन्स्टंट ढोकळा, कलाकृतीमध्ये रेशीम धाग्यापासून ज्वेलरी, हस्तनिर्मित ज्वेलरी, बांबू पासून कलाकृती जसे जहाज, टोपल्या, विविध सुगंधित अगरबत्ती, धूपबत्ती, मूग वड्या, पोहा चिवडा, सेंद्रिय शेती उपयुक्त गांडूळ खत तसेच कॅन्टीनमध्ये स्वादिष्ट आलू भजे, झुणका-भाकर उपलब्ध केल्या गेली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संवर्ग विकास अधिकारी किरण कुमार धनवडे उपस्थित होते. मंचावर माजी जिल्हा परिषद सदस्य हरीश गेडाम व सामाजिक कार्यकर्ते रमेश पिंपरे उपस्थित होते. श्वास व प्रथम प्रभाग संघाच्या अध्यक्ष उपस्थित होत्या व बी.एम.एम उमक मॅडम उपस्थित होते. प्रास्ताविक उज्वला गेडाम यांनी केले तर संचालन मंजू कांबळे व आभार प्राची कोंडागुरूला यांनी केले. याप्रसंगी संपूर्ण उमेद टीम उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.