Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: किरकोळ वादातून चुलत भावाच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून जखमी केले
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
किरकोळ वादातून चुलत भावाच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून जखमी केले आमचा विदर्भ - ब्यूरो रिपोर्ट्स चंद्रपुर - माजरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुस...


किरकोळ वादातून चुलत भावाच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून जखमी केले
आमचा विदर्भ - ब्यूरो रिपोर्ट्स
चंद्रपुर -
माजरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारला सकाळी फिर्यादी लल्लू बडकुरूपन शेवडया वय ६४ वर्षे यांनी चुलत भाऊ शिवकुमार उर्फ देवीलाल शेवडया यांच्या घरी जावून प्रकृतीबाबत विचारणा केली. यातच दोघांमध्ये वाद निर्माण झाला, यात शिवकुमार उर्फ देवीलाल शेवडया याने शिवीगाळ करीत आपल्या घरात जावून लोखंडी रॉड आणून चुलत भाऊ लल्लू बडकुरूपन शेवडया यांच्या डोक्यावर जबर मारहाण केली असता लल्लू बडकुरूपन शेवडया हा गंभीर जख्मी झाला. त्याला ताबडतोब प्राथमिक आरोग्य केंद्र माजरी येथे दाखल करण्यात आले. याची तक्रार फिर्यादी लल्लू बडकुरूपन शेवडया यानी माजरी पोलीस ठाण्यात दिली असता आरोपी शिवकुमार उर्फ देवीलाल शेवडया यांच्या विरुद्ध कलम ३२४ भादवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास ठाणेदार विनीत घागे यांच्या मार्गदर्शनात धनराज पांचोडबरिया, रमेश तुराणकर, हरिदास चोपने करीत आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top