Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: अल्ट्राटेक सिमेंट कंपनी कडून सुरू केलेली पाणपोई बनली शोभेची वस्तू
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अल्ट्राटेक सिमेंट कंपनी कडून सुरू केलेली पाणपोई बनली शोभेची वस्तू मागील दोन महिन्यांपासून पाण्याचा पुरवठा बंद धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ...

  • अल्ट्राटेक सिमेंट कंपनी कडून सुरू केलेली पाणपोई बनली शोभेची वस्तू
  • मागील दोन महिन्यांपासून पाण्याचा पुरवठा बंद
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
अल्ट्राटेक कंपनी कडून मोठ्या थाटात सुरु करण्यात आलेली थंड पाण्याची पाणपोई मागील दोन महिन्यांपासून बंद पडून असून कडक उन्हाळ्याचे दिवस सुरु असल्याने जिल्हा परिषद प्रशासनाने नागरिकांकरिता पिण्याच्या पाण्याची व बसण्याकरिता आच्छादन टाकण्याची व्यवस्था ग्रामपंचायतीने आपल्या स्तरावर करण्याचे निर्देश दिले आहे.
असे असतांना येथील थंड पिण्याचे पाण्याची पाणपोई बंद पडून आहे. ग्रामपंचायतीचे पदाधिकाऱ्यानी व नागरिकांनी पाणपोई सुरु करण्याकरिता कंपनीला विनंती केली असुन अल्ट्राटेक कंपनी प्रशासनाने लवकरात लवकर थंड पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावी अशी विनंती नागरिकांनी सुद्धा केली आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top