- गोपाल नगरात विद्युत दाब वाढवा अन्यथा आंदोलन
- नगरसेवक अरविंद डोहे सह नगरवासी यांचे उपकार्यकारी अभियंता यांना निवेदन
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
गडचांदूर येथील प्रभाग क्र पाच गोपाल नगरात विद्युतचा दाब फार कमी असून त्याभागातील कुलर पंखे चालत नाही. रात्रोला सुद्धा पंखे कुलर चालत नसल्याने डासांचा मोठा प्रमाणात त्रास होत असल्याने तब्बेतीत बिघाड होत आहे. घरगुती बोरवेल चालत नसल्याने पाण्याची टंचाई सुद्धा भासत आहे. उष्णता खूप वाढत असल्याने घरात कुलर, पंखे लावल्या शिवाय राहू शकत नाही. अश्या कमी दाबात कुलर व पंखे लावल्यास जळण्याची दाट शकता आहे. त्यामुळे तेथील नागरिक या विद्युत कमी दाबा मुळे अक्षरशा हैराण झाले असल्याने तेथील नागरिकांनी नगरसेवक अरविंद डोहे सह इतर नागरिकांनी आज उपकार्यकारी अभियंता इंदूरकर व सहाययक अभियंता राऊत याना भेटून निवेदन दिले व गोपाल नगरातील विद्युत दाब वाढवा अन्यथा आंदोलन करू अश्या आशयाचे निवेदन दिले. असता त्यांनी तात्पुरती काही व्यवस्था करू व येत्या दोन महिन्यात नवीन विद्युत डीपी लावु असे आश्वासन दिले. यावेळी नगरसेवक अरविंद डोहे, अरविंद कोरे, रमाकांत काळे, दीपक गुरनुले, बबलू रासेकर, राजू माणुसमारे आदी गोपाल नगरातील नागरिक उपस्थित होते. आता विद्युत मंडळ काय करतीय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.