Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: महामार्गावर असलेल्या पेट्रोल पंप जवळील मृत जनावर उचलण्यास ग्रामपंचायतची टाळाटाळ
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
महामार्गावर असलेल्या पेट्रोल पंप जवळील मृत जनावर उचलण्यास ग्रामपंचायतची टाळाटाळ लोकांना दुर्गंधीचा होत आहे मोठा त्रास... धनराजसिंह शेखावत - ...

  • महामार्गावर असलेल्या पेट्रोल पंप जवळील मृत जनावर उचलण्यास ग्रामपंचायतची टाळाटाळ
  • लोकांना दुर्गंधीचा होत आहे मोठा त्रास...
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
गडचांदूर-राजुरा राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या महेंद्र पेट्रोलपंप जवळ गेल्या 5 दिवसापासून मृत जनावर पडून असल्याने दुर्गंधी सुटली असून याचा मोठा त्रास पेट्रोल पंप वर येणाऱ्या ग्राहकांना व येथून ये-जा करणाऱ्या लोकांना होत आहे.
पेट्रोल पंप मॅनेजर ने मृत जनावर उचलण्याबाबत थुट्रा ग्रामपंचायत च्या सरपंच व कर्मचारी ला सांगितले मात्र टाळाटाळ करीत असल्याचे सांगितले. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे तात्काळ लक्ष देउन कारवाई करावी अशी मागणी पेट्रोल पंप मॅनेजर ने केली आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top