Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: नागरिकांना शासनाचा पुन्‍हा एकदा लोडशेडींगच्‍या माध्‍यमातुन शॉक
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
नागरिकांना शासनाचा पुन्‍हा एकदा लोडशेडींगच्‍या माध्‍यमातुन शॉक विज भारनियमन त्‍वरित मागे घ्‍यावे अन्‍यथा तिव्र आंदोलन छेडू – आ. सुधीर मुनगंट...

  • नागरिकांना शासनाचा पुन्‍हा एकदा लोडशेडींगच्‍या माध्‍यमातुन शॉक
  • विज भारनियमन त्‍वरित मागे घ्‍यावे अन्‍यथा तिव्र आंदोलन छेडू – आ. सुधीर मुनगंटीवार
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
चंद्रपूर जिल्‍हयातील नागरिकांना राज्‍य शासनाने पर्यायाने महावितरणाने पुन्‍हा विजेच्‍या भारनियमनाच्‍या माध्‍यमातुन जनतेला शॉक दिला आहे. विजेचे भारनियमन पुन्‍हा सुरु केल्‍याने ऐन उन्‍हाळयात नागरिकांमध्‍ये असंतोष निर्माण झाला आहे. हे भारनियमन त्‍वरीत मागे घ्‍यावे अन्‍यथा भाजपा आंदोलनासाठी रस्‍त्‍यावर उतरेल असा इशारा विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिला आहे.
महावितरण कंपनी अंतर्गत विजेची मागणी व पुरवठा यात तफावत होत असल्‍यामुळे भारनियमन करण्‍यात येत असल्‍याचे महावितरण तर्फे सांगीतले जात आहे. पण यात सर्वसामान्‍य जनतेला त्रास देणे ही बाब निश्चितच अन्‍यायकारक आहे. शासनाने यातील समस्‍या दुर करत तोडगा काढणे गरजेचे आहे. उन्‍हाळा कडक तापणे सुरु झाले आहे. अशा परिस्थितीत भारनियमन लादुन जनतेचे हाल करणे शासनाने सुरु केले आहे. शेतक-यांना सुध्‍दा या भारनियमाचे चटके सोसावे लागणार आहे. कोणत्‍या न कोणत्‍या कारणाने सरकार जनतेला छळत आहे. घरगुती विज ग्राहक असो वा शेतकरी विजेचे देयक भरायला थोडाही उशीर झाला तरी त्‍वरित विज कनेक्‍शन कापले जाते. पण लोडशेडींग करताना शासन नागरिकांच्‍या भावनांचा त्‍यांना होणा-या त्रासांचा अजिबात विचार करीत नाही.
चंद्रपूर हा वीजनिर्मिती करणारा जिल्हा आहे. येथील चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातुन 2920 मेगावॅट वीजनिर्मिती होते. जगातले प्रमुख उष्ण शहर म्हणून चंद्रपूरची नोंद आहे. या शहरानजीक कोळश्याच्या खाणी आहेत.त्यामुळे चंद्रपूर शहराच्या उष्णतेत अधिकाधिक भर पडत आहे.
विजेची मागणी पुर्ण करणे ही शासनाची जवाबदारी आहे. शासनाने पर्यायाने महावितरणने आपली जवाबदारी पुर्ण करावी पण जनतेला त्रास देवु नये असेही आ. मुनगंटीवार यांनी म्‍हटले आहे. शासनाने त्‍वरीत भारनियमन सरसकट मागे घ्‍यावे अन्‍यथा भारतीय जनता पार्टी आंदोलनासाठी रस्‍त्‍यावर उतरेल असा इशारा आ. मुनगंटीवार यांनी दिला आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top