शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात टेक्नोत्सव व अभिरंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. टेक्नोत्सव कार्यक्रमाचे उद्धघाटन अति. पोलिस. अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्याहस्ते करण्यात आले. मुख्य अतिथी म्हणून वेकोली क्षेत्रीय महा व्यवस्थापक संजय शुक्ल, प्राचार्य डॉ. आकोजवार, प्रा. धिरज कपूर, टेक्नोत्सवचे समन्वयक डॉ. सुशील अंबाडकर व सहसमन्वयक प्रा. सुदर्शन बुटले आदी मंचावर उपस्थित होते. सदर कार्यक्रम महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना करियर निवडीविषयी मार्गदर्शन करित प्रोत्साहन केले. तर साबीर यांनी सर्व अभियांत्रिकी शाखांचे महत्त्व सांगितले. व अभियांत्रिकीचे अॅप्लिकेशन बघण्याकरिता माईन्सला भेट देण्याचा आग्रह केला. प्राचार्य डॉ. आकोजवार यांनी तांत्रिक तथा सांस्कृतिक स्पर्धेत सहभागी होऊन विद्यार्थ्यांनी सर्वांगीण विकास करावा. असे आवाहन विद्यार्थ्यांना केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता विद्यार्थी अक्षय खनके, प्रियंशू सोमकुबर, शुभम नागरमोजे व शुभम लोधी यांनी परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमास संस्थेतील सर्व अधिष्ठाता, विभागप्रमुख, सर्व प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ. सुशील अंबाडकर यांनी केली तर आभार प्रा. कपूर यांनी केले.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.