Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: क्षुल्लक कारणामुळे एकाचा खून
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
क्षुल्लक कारणामुळे एकाचा खून धक्कादायक - क्षुल्लक वाद टोकाला गेला राजुरा तालुक्यातील घटना अविनाश रामटेके - आमचा विदर्भ प्रतिनिधी विरूर स्टेश...

  • क्षुल्लक कारणामुळे एकाचा खून
  • धक्कादायक - क्षुल्लक वाद टोकाला गेला
  • राजुरा तालुक्यातील घटना
अविनाश रामटेके - आमचा विदर्भ प्रतिनिधी
विरूर स्टेशन -
क्षुल्लक कारणामुळे शेजारी राहणाऱ्या कुटुंबाच्या बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले आणि त्यात लोखंडी पावड्याने डोक्यावर मारुन एकाचा नाहक जीव गेल्याची धक्कादायक घटना राजुरा तालुक्यातील पंचाऴा या गावात घटली.
मिळालेल्या माहितीनुसार पंचाळा येथे ड्रायव्हरी चे काम करणारे गणेश मडावी वय ३५ हे सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान कामावरून आल्यावर त्यांनी त्यांच्या घरातील पाळीव बांधलेली कुत्रे सोडले व आंघोळीला गेले. ते पाळीव कुत्रे समोर असलेल्या भोंगऴे यांचे अंगणात गेली. भोंगळे कुटुंबाने कुत्र्याला हटकले. कुत्र्याच्या ह्या क्षुल्लक कारणाने या दोन्ही कुटुंबियात बाचाबाची झाली. जातीवाचक शिवीगाळ झाली, बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यातच प्रभाकर भोंगऴे यांनी गणेश मडावी यांचे दोन्ही हात पकडले व रोहीत भोंगऴे यांनी बांबुचा दांडा असलेल्या लोखंडी फावड्याने डोक्यावर मारले. डोक्यावर जबर मार लागून रक्तस्त्राव झाल्याने गणेश मडावी याना तात्काळ ग्रामीण रुग्णालय राजुरा येथे नेण्यात आले मात्र डॉक्टरानी गणेश मडावी ला मृत घोषित केले. गुरुवार दि. २१ एप्रिलला सायंकाळी ६ ते ७ वाजताच्या सुमारास घटली. 
मृतकाच्या पत्नी सुनीता गणेश मडावी, मृतकाचे आई गीताबाई मारोती मडावी, मृतकाचे भाऊ धनराज मारोती मडावी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिता १८६० कलम ३०२, ५०४, ५०६, ३४, अनुसूचीत जाती आणि अनुसूचीत जमाती (अत्‍याचार प्रतिबंधक) अधिनियम १९८९, ३(१)(s), ३(२)(पाच) अन्वये गुन्हा दाखल केला असून आरोपी प्रभाकर भोंगऴे वय ५२ , रोहीत भोंगऴे वय २१, ताराबाई प्रभाकर भोंगळे वय ४५ व त्यांच्या कुटुंबातील एका महिलेला अटक केली आहे. समोरील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार यांच्या मार्गदर्शनात विरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल चौहान करीत आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top