शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
सावरकर नगर येथे नागरिक मागील 25 वर्षापासुन वास्तव करत आहे. असे असले तरी सदर झोपडपट्टी हटविण्या संदर्भात रेल्वे प्रशासनाकडून हालचारी सुरु करण्यात आल्या आहे. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये रोष आहे. ही बाब लक्षात घेता सदर झोपडपट्ट्या हटवू नये अशी मागणी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली असून सदर मागणीचे निवेदन यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने रेल्वे प्रबंधक मुर्ती यांना देण्यात आले आहे. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे शहराध्यक्ष पंकज गुप्ता, अल्पसंख्याक विभागाचे शहराध्यक्ष सलिम शेख, तिरुपती कलगुरुवार, युवती प्रमूख भाग्यश्री हांडे यांच्यासह इतर कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
जलनगर आणि सावरकर नगर येथील झोपडपट्टी वासीयांना रेल्वे विभागाच्या वतीने नोटीस बजावण्यात आली असून रेल्वे विभागाशी संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे येथील घरे हटविण्यात येतील अशी भिती स्थानिकांमध्ये निर्माण झाली आहे. येथील नागरिक मागील तिस ते चाळीस वर्षापासून येथे वास्तव्यास आहे. मनपाचा करही ते अदा करत आहे. असे असतांना रेल्वे विभागाने त्यांना पाठविलेल्या नोटीसीमुळे त्यांच्यात सभ्रमास्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान आज यंग चांदा ब्रिगेडच्या प्रतिनिधींनी सदर ठिकाणची पाहणी केली आहे. यावेळी यंग चांदा ब्रिगेच्या कार्यकर्त्यांनी रेल्वे विभागाचे प्रंबधक मुर्ती यांची भेट घेत सदर विषयावर त्यांच्याशी चर्चा केली. तसेच सदर झोपडपट्टी हटविण्यात येऊ नये अशी मागणी करत मागणीचे निवेदन त्यांना दिले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.