Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: संत फुलाजी महाराजांनी लोककल्याणासाठी देह झिजविला - केशवदादा इंगळे यांचे उदबोधन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
संत फुलाजी महाराजांनी लोककल्याणासाठी देह झिजविला केशवदादा इंगळे यांचे उदबोधन आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स राजुरा - समाजातील सर्वांनी सुख स...

  • संत फुलाजी महाराजांनी लोककल्याणासाठी देह झिजविला
  • केशवदादा इंगळे यांचे उदबोधन
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
समाजातील सर्वांनी सुख समाधानाने राहावे आणि सर्वांचे कल्याण व्हावे, हा विचार घेऊन सद्गुरू संत फुलाजी महाराज यांनी जीवनभर लोक प्रबोधनाचे कार्य केले. धर्म, त्यातील समाजहितेशी विचार यांची सांगड सद्याच्या परिस्थितीशी घालत अज्ञानापासून ज्ञानरुपी प्रकाशाकडे समाजाला नेण्याचा त्यांनी अखंड प्रयत्न केला. आता त्यांच्या विचारांना आपल्या जीवनात स्थान देऊन सर्वांनी त्याचा अंगीकार करावा, असे प्रतिपादन संत फुलाजी बाबा यांचे चिरंजीव सद्गुरू केशव दादा इंगळे यांनी केले. राजुरा येथे आध्यात्मिक सत्संग वार्षिक महोत्सवात आयोजित सत्संगात ते बोलत होते.
राजुरा शहरातील जवाहर नगर येथे श्री सद्गुरू फुलाजी बाबा ध्यान मंदिर यांच्या येथे झालेल्या द्वी दिवसीय 9 वा आध्यात्मिक सत्संग वार्षिक महोत्सव 13 व 14 एप्रिल ला आयोजित करण्यात आला. यानिमित्ताने श्री. सद्गुरू फुलाजी बाबा यांच्या प्रतिमेचे व ग्रंथ पूजन आणि ध्वजारोहन करून कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी सुब्बई येथून आलेले महाराजांचे परम भक्त भाऊजी जाभोर, प्रदीप बोटपल्ले आणि केशवदादा यांचेसोबत आलेले वीस भक्तगण या धार्मिक सोहळ्यात सहभागी झाले.
या कार्यक्रमात माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, ध्यान मंदिर समितीचे सचिव सुधाकर जाधव, कोषाध्यक्ष गजेंद्र ढवस, माजी नगरसेवक गजानन पहानपटे, ज्योती कुळमेथे, योगिता भोयर, भाग्यलक्ष्मी भोयर, वासुदेव सोमलकर, मारोती आस्वले, भाऊराव खोब्रागडे, गंगाधर बोबडे, काशिनाथ अडवे, गंगाधर जाधव, सहदेव उरकुडे, सुभाष गोहणे, किशोर उरकुडे, प्रभाकर लोनगाडगे यांचेसह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. महाप्रसादाने सोहळ्याची सांगता झाली.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top