आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती राजुरा शहरातील बेघर वस्ती वॉर्डांत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी वॉर्डातील शेकडो लोकांनी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केले.
बेघर वॉर्डातील मुख्य चौकात डॉ. आंबेडकर यांची प्रतिमा ठेवून हा चौक निळ्या पताकांनी सजविण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुले यांची प्रतिमा ठेवून वॉर्डवासिय नागरिक महिला, पुरुष, मुले यांनी वंदना व प्रार्थना केली. या कार्यक्रमाला दौलत वनकर, दीपक वनकर, माधुरी माथनकर, संध्या चांदेकर, वनिता खोब्रागडे, अंजली गुंडावार, हिना शेख, स्नेहा टेकाम, चंद्रकला वनकर, विमल लामसोगे, संदीप भगत, विजय डोंगरे, कैलास तोडे, मैना खोब्रागडे, रोहन गावंडे, कमलाकर माथनकर, दीपक वनकर, प्रेम माथनकर, राज माथनकर, स्विटी वनकर, दीक्षा वनकर, राजेश्री माथनकर यांचे सह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.