Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: राजुरा वनपरिक्षेत्रातील जंगल आगीपासून वाचविण्यासाठी वनविभागाचा 'ऍक्शन प्लॅन'
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
राजुरा वनपरिक्षेत्रातील जंगल आगीपासून वाचविण्यासाठी वनविभागाचा 'ऍक्शन प्लॅन' निगराणी व सतर्कतेमुळे मौल्यवान वनस्पती व वन्यप्राणी सुर...
  • राजुरा वनपरिक्षेत्रातील जंगल आगीपासून वाचविण्यासाठी वनविभागाचा 'ऍक्शन प्लॅन'
  • निगराणी व सतर्कतेमुळे मौल्यवान वनस्पती व वन्यप्राणी सुरक्षित
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
राज्याच्या काही वनपरिक्षेत्रात आगीचा वणवा भडकला आहे. आगीमुळे वनसंपदाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक वनसंपत्ती जळून खाक झाली आहे. या आगीच्या घटना उपाययोजने अभावी घडल्याचे बोलले जात आहे. पण राजुरा वनपरिक्षेत्रात मागील वर्षात काही तुरळक घटना वगळता या वर्षांत मात्र आगीच्या एकही घटना घडल्या नाही. जंगलाला आगीपासून वाचविण्यासाठी वनविभागाने नियोजनबद्ध 'ऍक्शन प्लॅन' तयार केल्याचे बोलले जात आहे. गावागावांत जनजागृती,प्रचार व प्रसारासह जंगलाची दिवसरात्र निगराणी व अग्नीवनरक्षकाच्या सतर्कतेमुळे किंमती वनसंपत्ती व वन्यप्राणी सुरक्षित असल्याचे दिसून येत आहे.
राजुरा वनपरिक्षेत्रात तीन उपपरिक्षेत असून तेरा वनबिट आहे. यात १० हजार ३७६.१३२ हेक्टर वनजमीन ही घनदाट जंगलाने व्यापली आहे. मौल्यवान किंमती सागवान झाडासह चिचवा, बांबू, बेल, सिसम व औषधी वनस्पतीचा समावेश आहे. सोबतच वाघ, सांबर, चितळ, अस्वल, रान गवा आदी वन्यप्राण्यांचा मुक्त संचार आहे. या वनस्पतीसह वन्यप्राण्यांना सुरक्षित ठेवण्याचे मोठे आव्हान विभागापुढे ठाकले आहे. दरम्यान राज्यासह मध्य चांदा वनवृतांतील काही वनपरिक्षेत्रात आगीचे तांडव सुरू असल्याने जंगलाचे मोठे नुकसान झाले आहे. उन्हाळ्यातच जंगलाला आग लागून वणवा भडकत असल्याने यावर उपाययोजना करण्याचे निर्देश विभागाकडून देण्यात येत असते. पण निष्काळजीपणामुळे आगीच्या घटना घडत असल्याचे दिसून येत आहे. परंतु राजुरा वनविभागाने जंगलाला आगीपासून वाचविण्यासाठी 'ऍक्शन प्लॅन' तयार केल्याचे स्पष्ट होत आहे. मुळात मोहाफुल व तेंदूपत्ता हे दोन घटक आगीसाठी कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. यावर उपाययोजना म्हणून विभागाने गावागावांत जनजागृती सुरू केली आहे. जनतेची सुसंवाद साधण्यात येत आहे.मोहाफुल संकलन करणाऱ्या गावकऱ्यांवर नजर ठेवून त्यांना योग्य मार्गदर्शन केले जात आहे. तसेच झाडा सभोवताल आग लावून नये याकरीता वनव्यवस्थापन समिती मार्फत जाळीचे वाटप केले आहे. ही जाळी झाडांला बांधण्यात येते व त्यात मोहाफुल जमा होत असते.त्यानंतर संबंधित महिला जमा झालेला मोहाफुल संकलन करण्यासाठी येते.या जाळीमुळे अल्पवेळ लागतो व वन्यप्राण्यांच्या हल्ल्यापासून बचाव केला जातो.तेंदूपत्ता व्यवसायाकरीता झाडांना नवीन पालवी फुटावी याकरीता आग लावण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्यांच्या प्रतिनिधींवर नजर ठेवून त्यांना यांपासून प्रवृत्त करण्यात येत आहे.
याव्यतिरिक्त जंगलात आगीचा वणवा पसरू नये याकरीता अग्नीरेषा आखली जात आहे.आधुनिक ब्लोअर मशीनच्या माध्यमातून आगीवर नियंत्रण केले जात आहे.कक्षनिहाय सीमेलगत रस्ता  तयार करून आगीपासुन सभोवतालचा परिसर सुरक्षित केला जात आहे. विशेष म्हणजे, वनविभागाचे अधिकारी, वनपाल,वनरक्षक व कर्मचारी मुख्यालयी रहात असल्याने आगीची माहिती मिळताच त्वरित आगीवर नियंत्रण मिळविण्यास येत आहे. सर्वच वन कर्मचाऱ्यांच्या मोबाईल वर फायर अँप डाऊनलोड केले असल्याने आगीची माहिती प्राप्त होत आहे.जिल्ह्यातील ताडोबा मध्ये  आगी संदर्भात केंद्र असल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात मदत मिळत आहे. दिवसरात्र जंगलाची गस्त करून जंगलावर नजर ठेवण्यात येत आहे.कर्मचारी डोळ्यांत तेल घालून जंगलाची निगराणी करीत आहे व त्यांच्यात सतर्कतेमुळे जंगलाचे आगीपासून बचाव करण्यात येत आहे. जंगलात उभे केलेल्या लोखंडी मचाण वरून दुर्भिणीच्या मदतीने नजर ठेवण्यात येत आहे.त्यामुळेच मौल्यवान वनस्पती व वन्यप्राणी सुरक्षित आहे.या उपाययोजना आखण्यासाठी मुख्य वनसंरक्षक लोणकर उपवनसंरक्षक स्वेता बोडडू, उपविभागीय वन अधिकारी अमोल गर्कल यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे. जंगलाला आगीपासून वाचविण्याच्या मोहिमेचे नेतृत्व वनपरिक्षेत्र अधिकारी विदेशकुमार गलगट करीत असून त्यांना वनपाल नरेंद्र देशकर, प्रकाश मत्ते, संतोष संगमवार, सुनील मेश्राम करीत आहे व त्यांना वनरक्षक संजय सुरपाते, दिलीप जाधव, मीरा राठोड, देवानंद शेंडे, प्रियंका जावळे, वर्षा वाघ, दिनेश चंदेल, अर्जुन पोले, साहस हाके व वन कर्मचारी यांचे सहकार्य मिळत आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top