Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: भद्रावती येथील शिर नसलेल्या निर्वस्त्र युवतीच्या हत्येचे कारण आले पुढे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
भद्रावती येथील शिर नसलेल्या निर्वस्त्र युवतीच्या हत्येचे कारण आले पुढे अपमानाचा बदला घेण्यासाठी मैत्रिनेचे केला मैत्रिणीचा घात स्थानिक गुन्ह...

  • भद्रावती येथील शिर नसलेल्या निर्वस्त्र युवतीच्या हत्येचे कारण आले पुढे
  • अपमानाचा बदला घेण्यासाठी मैत्रिनेचे केला मैत्रिणीचा घात
  • स्थानिक गुन्हे शाखा व सायबर सेल यांनी ओळख पटवून केला गुन्ह्याचा पर्दाफाश
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
चंद्रपूर -
पोलीस स्टेशन भद्रावती हद्दीतील भद्रावती ते तेलवासा रोड मायक्रॉन शाळे मागील पडीत शेत शिवारात दि. 4 एप्रिल 2022 रोजी पहाटेच्या दरम्यान अंदाजे 20 ते 22 वर्षीय युवतीचे मुंडके कापून निघृण हत्या करून निर्वस्त्र स्थितीत मिळून आली होती. मृतक युवतीच्या शरीराला मुंडके (शिर) नव्हते. कोणीतरी अज्ञात इसमाने सदर युवतीच्या खुन करून तिची ओळख पटु नये म्हणून तिचे मुंडके शरीरापासुन वेगळे करून तिचे मृत शरीर निर्वस्त्र अवस्थेत ठेवले. यावरून पोलीस स्टेशन भद्रावती येथे अज्ञात इसमांविरूद्ध कलम 302, 201 मा. दं.वि.चा गुन्हा नोंदविण्यात आला.
सदर घटनास्थळी पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर चे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी तात्काळ भेट देवून मृतदेहाचे व परिसराची पाहणी केली. मृतदेह निर्जनस्थळी मुंडके नसलेल्या नग्न अवस्थेत होता. आरोपीने मयताची ओळख पटू नये म्हणून तिचा शिर कापून नेले तसेचे कपडे सुद्धा काढून घेवून गेला अशा अवस्थेत कोणत्याही प्रकारचे पुरावा/खुन/निशानी नसल्यामुळे सदर मृत महीलेची ओळख पटविणे पोलीसांना आव्हाण होते.
पोलीस अधीक्षक अरविंद साळवे व अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेतील सर्व अधिकारी व पथक तसेच सायबर सेल मधील सायबर एक्सपर्ट यांचे मार्फतीने मृत महिलेच्या शरीरावरील खुना मृत देहाजवळ मिळालेल्या तिच्या वापराच्या वस्तू ईत्यादी शोध पत्रीका तयार करून शोध घेण्यात आला. तसेच चंद्रपूर व बाजुच्या सर्व जिल्हयातून या वयाच्या हरविलेल्या/पळून गेलेल्या मुलींची शहानिशा केली. परंतू उपयुक्त माहिती मिळून आली नाही. घटना घडून काही दिवस होवून हरविलेल्या तक्रार प्राप्त झाली नाही. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखा व सायबर सेल यांनी तांत्रीक तपास केला तसेच गोपनिय माहिती मिळविण्याचा अहोरात्र प्रयत्न केला. त्यामध्ये पोलीसांना यश आले. गोपनिय माहितीदाराकडून सदर महिलेची ओळख पटविण्यात आली. तिचा मोबाईल क्रमांक प्राप्त करण्यात आला. त्यावरून तिच्या राहत्या घराचा रामटेक जि. नागपूर येथील पत्ता प्राप्त झाला त्यावरून तिची मोठी बहीन हिचेशी संम्पर्क साधून ओळख पटविण्याची खात्री करण्यात आली. तिचे बहीनीने तिच्या शरीरा वरील व्रण व वापरीतील वस्तू पाहून मृतक महिला हि तिची बहीन असल्याची खात्री केली.
सदर खुनातील आरोपी शोधण्याचे आदेश पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना दिले. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि जितेंद्र बोबडे, सपोनि संदीप कापडे, पोलीस उपनिरीक्षक अतुल कावळे व स्थानिक गुन्हे शाखेतील 20 अंमलदार यांचे तिन वेगवेगळे पथके तयार केली. पोलीस अधीक्षक व अपर पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनात तसेच सायबर सेल यांचे मदतीने तपास कार्य चालू केले. स्थानिक गुन्हे शाखेतील सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच सायबर सेल चंद्रपूर यांनी गुन्हयाचा तांत्रीक तपास केला. सदर तात्रीक तपासाचे आधारे सदर गुन्हयातील मुख्य सुत्रधार एक महिला विधीसंघर्षग्रस्त बालक विचारपूस करुन ताब्यात घेण्यात आले.
सदर ताब्यात घेतलेल्या विधी संघर्षग्रस्त बालक हिचेकडे सदर गुन्हयाबाबत केलेल्या चौकशी मध्ये माहिती प्राप्त झाली आहे की, यातील मयत मुलगी व ती मैत्रीणी होत्या एकाच रूममध्ये राहत होत्या काही महिण्यापासून वेगवेगळ्या करणामुळे आपसामध्ये भांडण होत होते. मयत मुलगी तिचा ईतर मित्रासमोर अपमान करीत होती. त्यामुळे तिचे मनात मयत मूली बद्दल रोष निर्माण होवून तिला अद्दल घडवायची असा तिने निश्चय केला. तिने तिचे (आरोपी) मित्राला हि गोष्ट सांगीतली दोघांनी एकत्रीत मयताला जिवे ठार मारण्याचे उद्देशाने कट रचला. त्याप्रमाणे मयताला ताब्यात घेतलेल्या विधीसंघर्षग्रस्त बालकाने दिनांक 03/04/2022 रोजी रात्री 08:45वा. वरोरा नाका येथे बोलवून घेतले. त्या ठिकाणावरून तिने व पाहीजे आरोपीने तिला मोटार सायकलवर बसवून घटनास्थळी घेवून गेले. रात्री 12:00 वा. सुमारास घटनास्थळी निर्जनस्थळी नेवन विधीसंघर्षग्रस्त बालकाने मयताला मारहाण करून जमीनीवर खाली पाडले नंतर तिचे पाय पकडून मांडीवर चाकूने दोन वार केले. सदर वेळी संघर्षग्रस्त आरोपीने मयताचे पोटावर बसून प्रथम गळा दाबून खून केला. नंतर तिची ओळख पटू नये म्हणून दोघांनीही दोघांच्याही चाकूने आळी पाळीने मयताचा गळा कापला तसेच मयताचे पुर्ण कपड़े व मुंडके घेवून मोटर सायकलवरून पसार झाले.
सदरची कामगीरी मा.पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, मा.अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, स.पो.नि. जितेंद्र बोबड़े, स.पो.नि.संदीप कापडे, पो.उपनि.अतुल कावळे. स.फौ. राजेंद्र खनके, नाईम खान संजय आतकुलवार, सतिश बागमारे, गणेश भोयर, अनुप डांगे, मिलींद जांभुळे. संदीप मुळे, प्रशांत नागोसे तसेच सायबर सेलचे मुजावर अली, वैभव पत्तीवार, राहल पोन्दे, भास्कर चिंचवलकर, संतोष पानघाटे, उमेश रोडे नितेश महात्मे यांनी केली.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top