विरेद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
परमपूज्य बोधिसत्व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१वी जयंती प्रवृत्ती फाउंडेशन च्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली. आयोजित कार्यक्रमात सर्व धर्मीय युवक उपस्थित होते. जाती-धर्मातील मतभेद विसरून बाबासाहेबांच्या विचाराचा वारसा जपत सर्वधर्म समभाव जोपासून मोठ्या थाटात शोभा यात्रा काढीत १३१ वी भीम जयंती साजरी करण्यात आली. यावेळी हजरत टिपू सुलतान फाउंडेशन चे असलम चाऊस, छावा फाउंडेशन चे आशिष करमनकर स्वराज फाउंडेशन चे आशिष व सर्व पदाधिकारी व मोठ्या संख्येने सर्वधर्मीय नागरिक उपसथित होते. शोभा यात्रे सोबत अल्पोपहार देण्यात आला.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.