Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: घराचे कुलूप तोडून दागिने व इलेक्ट्रानिक्स साहित्य लंपास
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
घराचे कुलूप तोडून दागिने व इलेक्ट्रानिक्स साहित्य लंपास गुरुदेव नगर धोपटाला येथे घरफोडी आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स राजुरा - अज्ञात चोरटय...

  • घराचे कुलूप तोडून दागिने व इलेक्ट्रानिक्स साहित्य लंपास
  • गुरुदेव नगर धोपटाला येथे घरफोडी
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
अज्ञात चोरटयांनी बंद घराचे कुलूप फोडून सोन्याचे दागीने, नगदी व टीव्ही असा दीड लाखांचा ऐवज लंपास केल्याचा प्रकार समोर आलाय. याबाबत पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध फिर्याद दाखल करण्यात आली आहे. 
गुरूदेवनगर धोपटाळा वास्तव्यास असलेले आणि सीजीएम कार्यलयात नौकरी करणारे श्रीनिवास कोपुल्ला हे कुटुंबासह आंध्रप्रदेशातील तिरूपती बालाजी देवस्थान ला दर्शनाकरीता गेले होते. दि. 17 एप्रिलला सकाळी 7 वाजताच्या दरम्यान देवदर्शन करून परत आल्यावर त्यांना त्यांचा घराचा लोखंडी ग्रील दरवाजा तुटलेला दिसला. घराची पाहणी केली असता त्यांना दोन लोखंडी अलमारीचे ताळे तुटलेले दिसले. अलमारीतील सामान व कपडे अस्ताव्यस्त टाकलेले दिसले. त्यांनी सामानाची पाहणी केली असता त्यांना जुनी वापरती हायर कंपनीची LED TV अंदाजे किमंत 16 हजार, बेडरूम मधील इंन्टेक्स कंपनीचा एक जुना वापरता TV किंमत अंदाजे 10 हजार, 1 तोळा वजनाचे सोन्याचे कानातील झुमके अंदाजे किंमत 40 हजार, सोन्याचे रिंग 1 ग्रँम अंदाजे किंमत 3 हजार, सोन्याची चैन 5 ग्रँम अंदाजे किंमत 20 हजार, सोन्याची अंगठी 5 ग्रँम अंदाजे किंमत 20 कानातील सोन्याचे वेल 5 ग्रँम अंदाजे किंमत 20 हजार, सोन्याची अंगठी 3 ग्रँम अंदाजे किंमत 9 हजार, पुजेमध्ये ठेवलेले चांदीचे पैसे व दागिने 15 हजार, असा एकुण 1 लाख 53 हजाराचा मुद्देमाल चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top