Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: मोदी सरकारच्या महागाई विरोधात राजुरा काँग्रेसचे धरणे आंदोलन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
मोदी सरकारच्या महागाई विरोधात राजुरा काँग्रेसचे धरणे आंदोलन विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी राजुरा - अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस,...

  • मोदी सरकारच्या महागाई विरोधात राजुरा काँग्रेसचे धरणे आंदोलन
विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस च्या निर्देशानुसार लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालय राजुरा येथे राजुरा तालुका काँग्रेस च्या वतीने पेट्रोल, डिझेल, एलपिजी गॅस, खाद्यतेलासह अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत वारेमाप दरवाढ करून गोरगरीब, सर्वसामान्य जनतेची लूटमार करणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात महागाई मुक्त भारत हे ब्रीद घेऊन एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार सुभाष धोटे म्हणाले की सत्तेवर येण्यापुर्वी हर वर्ष दोन करोड़ लोकांना नोकरी, प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख रूपये देऊ असे आश्वासन ‌दीले होते, नोकरी तर दीलीच नाही, उलट‌ लाखो नोकरी दारांच्या नोकरी गेल्यां असं फाकेबाज मोदी सरकार आहे, पेट्रोल, डिझेल, एलपिजी गॅस व जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत दररोज होणारी दरवाढ आणि महागाईने सामान्य जनतेचे हाल होत आहेत. केंद्र सरकारने ही दरवाढ तातडीने थांबवून बेसुमार केलेली दरवाढ कमी करावी अन्यथा जनता या सरकारला धडा शिकविल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही. असे धोटे म्हणाले, या प्रसंगी अनेक नेत्यांनी आपल्या भाषणातून मोदी सरकार पुरस्कृत महागाई चा निषेध केला. धरणे आंदोलना नंतर केंद्र सरकारने महागाई कमी करून गोरगरीब जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी करणारे निवेदन तहसीलदार हरिष गाडे यांच्या माध्यमातून भारताचे महामहिम राष्ट्रपती यांना पाठविण्यात आले. 
या प्रसंगी या प्रसंगी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष कविता उपरे, सं गां नि योजनेचे अध्यक्ष साईनाथ बतकमवार, काँग्रेस ओबीसी आघाडीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नंदकिशोर वाढई, माजी नगरसेवक हरजितसिंग संधू, गजानन भटारकर, आनंद दासरी, माजी नगरसेविका दिपा करमनकर, वज्रमाला बतकमवार, गीता रोहणे, माजी सभापती सदस्य कुंदा जेणेकर,  माजी उपसभापती मंगेश गुरनुले,  शहराध्यक्षा संध्या चांदेकर, इंटक चे कामगार नेते शंकर दास, नागेश मेदार, राजुरा काँग्रेसचे कार्याध्यक्ष एजाज अहमद, युवक काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष शंतनु धोटे,  अॅड. अरूण धोटे यासह तालुका काँग्रेस, शहर काँग्रेस, महिला काँग्रेस, सेवादल काँग्रेस, युवक काँग्रेस, अनुसूचित जाती व जमाती विभाग काँग्रेस, अल्पसंख्यक विभाग काँग्रेस, ओबीसी  काँग्रेस, एनएसयूआय अशा काँग्रेसच्या सर्व विभागाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top