Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: शुद्ध व थंड पाण्याच्या मशीनचे लोकार्पण
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शुद्ध व थंड पाण्याच्या मशीनचे लोकार्पण हनुमान मंदिरात जैन बांधवांकडून शुद्ध व थंड पाण्याची मशीन भेट आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स राजुरा - ...
  • शुद्ध व थंड पाण्याच्या मशीनचे लोकार्पण
  • हनुमान मंदिरात जैन बांधवांकडून शुद्ध व थंड पाण्याची मशीन भेट
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
स्थानिक श्री हनुमान मंदिर परिसरात राजुरा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष संदीप जैन व त्यांचे बंधू रुपेश जैन यांनी त्यांच्या आई पुष्पलता व वडील शांतीलाल जैन यांच्या स्मृतीप्रित्यर्थ स्व खर्चाने थंड पाणी उपलब्ध व्हावे हा उदात्त हेतु ठेवुन मुख्य बाजारात मेन रोड वरील वर्दळीच्या ठिकाणी डिफ्रीज वॉटर मशिन प्रस्थापित केली. या शुद्ध व थंड पाण्याच्या मशीनचे लोकार्पण श्री हनुमान मंदिर देवस्थानाचे अध्यक्ष डॉ. सुरेश उपगन्लावार व माजी उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले. 
लोकार्पण प्रसंगी देवस्थान कमिटीचे उपाध्यक्ष अँड अरुण धोटे, कोषाध्यक्ष अँड निनाद येरणे, सचिव प्रशांत गोठी, सदस्य सतीश धोटे, प्रकाश बेजंकीवार, बंडु जयपूरकर, सुरेश रागीट, प्रकाश चांडक तसेच प्रतिष्ठित नागरिक डॉ. उमाकांत धोटे, गजेंद्र झंवर, पूनम शर्मा, रवी जामुनकर, डॉ. अशोक जाधव, डॉ. राजेश कतवारे, अनिल आवारी, पोटे, संतोष रामगिरवार, शंकर झंवर, सुनील चांडक, मनोज शर्मा सह इतर मान्यवरांची उपस्थिती होती.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top