Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: गडचांदूर कोरपना मार्गावर भीषण अपघात
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
गडचांदूर कोरपना मार्गावर भीषण अपघात खिर्डी येथील धनराज मालेकर आणि शेखर ढवस यांचा जागीच मृत्यू संतापलेल्या लोकांनी केली वाहतूक ठप्प पोलिसांच्...
  • गडचांदूर कोरपना मार्गावर भीषण अपघात
  • खिर्डी येथील धनराज मालेकर आणि शेखर ढवस यांचा जागीच मृत्यू
  • संतापलेल्या लोकांनी केली वाहतूक ठप्प
  • पोलिसांच्या प्रयत्नाने 3 तासानंतर वाहतूक सुरू 
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
गडचांदूर कोरपना मार्गावर खिर्डी गावाजवळ मॉर्निंग वॉक ला गेलेल्या दोन युवकांना ट्रकने उडवले. यात दोघांचा जागीच मृत्यू झाल्याने मार्गावर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. गावातील लोकांना माहिती मिळताच संतापलेल्या लोकांनी वाहतूक पूर्णपणे ठप्प केली. 
मिळालेल्या माहितीनुसार गडचांदूर शहरातील गांधी स्कॉलर अकॅडमी चे मुख्याध्यापक धनराज मालेकर वय 33 व गडचांदुर येथील मेडिकल व्यावसायिक शेखर ढवस वय 34 नियमितपणे सकाळी मॉर्निंग वॉक ला गेले असता खिर्डी ते धामणगावच्या मधात सकाळी 5 वाजता सुमारास भरधाव वेगाने जात असलेल्या अज्ञात ट्रकने दोघांना जोरदार धडक दिली. या अपघाताच्या विरोधात संतप्त नागरिकांनी वाहतूक ठप्प केली. जोपर्यंत अज्ञात वाहनाचा शोध घेऊन चालक-मालकास अटक करण्यात येत नाही तो पर्यंत वाहतूक सुरु होणार नाही अशी भूमिका संतप्त लोकांनी घेतल्यामुळे वाहतूक ठप्प केली. घटनेची माहिती मिळताच गडचांदुर पोलिसांनी घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी संतप्त लोकांना समजूत घातली आणि अखेर तीन  तासानंतर वाहतूक सुरू झाली. गडचांदुर पोलीस अधिकारी प्रमोद शिंदे व त्यांचे सहकारी फरार झालेल्या वाहनाचा शोध घेत आहेत व पुढील तपास करीत आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top