Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: कळमना येथे १ मे रोजी स्व. नागोबा वाढई यांचा पुतळा व स्मारकाचे अनावरण
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
कळमना येथे १ मे रोजी स्व. नागोबा वाढई यांचा पुतळा व स्मारकाचे अनावरण म.रा. आदर्श गाव पुरस्कार प्राप्त सरपंच चंदू पाटील मारकवार हे करतील उद्घ...

  • कळमना येथे १ मे रोजी स्व. नागोबा वाढई यांचा पुतळा व स्मारकाचे अनावरण
  • म.रा. आदर्श गाव पुरस्कार प्राप्त सरपंच चंदू पाटील मारकवार हे करतील उद्घाटन
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
राजुरा तालुक्यातील मौजा कळमना येथील दानशूर व्यक्तीमत्व समाजसेवक स्वर्गीय नागोबा पाटील वाढई यांच्या पुतळ्याचे व स्मारकाचे अनावरण दिनांक १ मे रोज रविवार ला दुपारी १२ वाजता कळमना येथे नवीन हनुमान मंदिराच्या पटांगणावर करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटक  महाराष्ट्र राज्याचा आदर्श गाव पुरस्कार प्राप्त राजगड चे सरपंच चंदू पाटील मारकवार, सहउद्घाटक शिवराम पाटील पाहनपट्टे, कार्यक्रमाचे अध्यक्ष कळमनाचे सरपंच अखिल भारतीय सरपंच परिषदचे विदर्भ सरचिटणीस नंदकिशोर वाढई, प्रमुख अतिथी म्हणून ग्रामगीताचार्य मारुती सातपुते, वडगाव चे माजी सरपंच तथा जेष्ठ नागरिक आनंदराव पाटील परसुटकर, उपसरपंच कौशल्या कावळे, पोलीस पाटील बाळकृष्ण पिंगे, तमुस अध्यक्ष महादेव ताजणे, ग्रा प सदस्य दीपक झाडे,  साईनाथ पिंपळशेळे, रंजना पिंगे, सुनिता उमाटे, प्रियंका गेडाम,  भाऊजी पाटील वाढई, जेष्ठ नागरिक पुरुषोत्तम पाटील काळे, नानाजी पाटील सपाट, महादेव पाटील विश्राम, महादेव पाटील पिंगे, विठोबा पाटील ताजने, नानाजी पाटील सुमटकर, माजी सरपंच सुधाकर पिंपळशेंडे, पोलीस पाटील गोपाल पाल इत्यादी उपस्थित राहणार आहेत. 
या प्रसंगी ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार, भजन मंडळाचा सत्कार, माजी सरपंच व पोलीस पाटील यांचा सत्कार, समाजसेवक व्यक्तींचा सत्कार, गरीबीतून शिक्षण पूर्ण करून यशस्वी होणाऱ्या युवकांचा सत्कार स्व. नागोबा पाटील वाढई यांच्या कुटुंबियांकडून करण्यात येणार आहे. परिसरातील नागरिकांनी मोठय़ा संख्येने या कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top