Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: घरात घुसून पट्टेदार वाघाने केला झोपलेल्या महिलेवर हल्ला
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
घरात घुसून पट्टेदार वाघाचा केला झोपलेल्या महिलेवर हल्ला हल्यात महिला ठार आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स सिंदेवाही - सिंदेवाही तालुक्यातील चि...

  • घरात घुसून पट्टेदार वाघाचा केला झोपलेल्या महिलेवर हल्ला
  • हल्यात महिला ठार
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
सिंदेवाही -
सिंदेवाही तालुक्यातील चिकमारा गावात घरात घुसून पट्टेदार वाघाने एका झोपलेल्या वयोवृद्ध महिले वर हल्ला केला. या हल्यात महिला ठार झाल्याची घटना दि. 28 एप्रिल गूरूवारच्या रात्रौ एक वाजताच्या सुमारास उघडकीस आली आहे. मृतक महिले चे नाव तुळसाबाई परसराम पेंदाम वय 89 रा. चिकमारा तालुका सिंदेवाही असे असून सदर महिला घरात झोपली असता रात्री साडेबारा-एक वाजताच्या दरम्यान पट्टेदार वाघाने ठार केले. घटनेची माहिती पोलीस स्टेशन सिंदेवाही पोलिस स्टेशनचे ठाणेदार घारे, एएसआय गेडाम, पोहवा गेडेकर, राहुल रहाटे हे घटनास्थळी दाखल झाले व घटनेचा पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनाकरिता पाठविला. समोरील तपास सिंदेवाही पोलीस करीत आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top