Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: चोरांनी चक्क खासदार बाळू धानोरकरांचाच बंगला फोडला
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
चोरांनी चक्क खासदार बाळू धानोरकरांचाच बंगला फोडला सामानाची नासधूस : तीन चोर जेरबंद डी.एस. ख्वाजा - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपूर - चोरांचे ...

  • चोरांनी चक्क खासदार बाळू धानोरकरांचाच बंगला फोडला
  • सामानाची नासधूस : तीन चोर जेरबंद
डी.एस. ख्वाजा - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
चोरांचे हौसले सध्या बुलंद झाले असून चोरांनी चक्क चंद्रपुरातील खासदारांचा बंगलाच फोडला. मात्र चोरट्यांच्या हाती काही लागले नाही. चोरांनी घरातील कपाट फोडले, सामानांची नासधूस केली. यावेळी केवळ चौकीदार आणि त्याची पत्नीच बंगल्यात होते. ही घटना काल रात्री घडली.
काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचा सरकार नगर येथे 'सुर्यकिरण' नावाचा बंगला आहे. याच बंगल्यात त्यांचे कार्यालय सुद्धा होते. आता कार्यालय दुसरीकडे हलवले. मात्र निवासासाठी खासदार धानोरकर या बंगल्याचा वापर करतात. काल मंगळवारी ते मुक्कामी नव्हते. रात्री वरोऱ्याला निघून गेले. हीच संधी साधून मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी बंगाल्याच्या सुरक्षा भिंतीवरुन उडी मारून आत प्रवेश केला. त्यावेळी चौकीदार आणि त्यांची पत्नी बंगल्यालगतच्या खोलीमध्ये गाढ झोपेत होते. त्यानंतर चोरट्यांनी मुख्य दाराचे कुलूप तोडले आणि आत प्रवेश केला.
बंगल्यातील इतर खोल्यांचेही कुलूप तोडले. मात्र त्यांच्या हाती काहीच लागले नाही. चोरांनी मात्र सामानाची नासधूस केली, कपाट फोडले. सकाळी नेहमीप्रमाणे चौकीदार साफसफाई करण्यासाठी गेला असता त्यांच्या लक्षात हा प्रकार आला. त्यांनी भ्रमणध्वनीवरून खासदार धानोरकर यांनी घरफोडीची माहिती दिली. या घटनेची तक्रार चौकीदाराने रामनगर पोलिसांत दाखल केली. त्यानंतर पोलिस यंत्रणा हादरली. मोठा फौज फाटा खासदारांच्या बंगल्यावर पोहोचला. बंगल्यातील सीसीटीव्ही तपासले. तेव्हा तीन युवक कुलूप तोडून आत प्रवेश करताना दिसले. त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी पथकं तयार केली.
बारा तासांच्या आता तिघांनाही जेरबंद केले. रोहित इमलकर वय २४, रा. दुर्गापूर, शंकर नेवारे वय २०, रा. दुर्गापूर, तन्वीर बेग वय २०, भंगाराम वॉर्ड, चंद्रपूर अशी आरोपींची नावे आहेत. खासदारांच्या बंगल्यातून खाली हात परत यावे लागल्याने या तिघांनी या परिसरातील आणखी दोन घरं फोडली. मागील काही दिवसांपासून चोरटे खासदारांच्या बंगाल्याची रेकी करीत होते. त्यांना खासदार येतात कधी, मुक्कामी कधी असतात, याची खडानखडा माहिती होती. त्यामुळेच खासदार नसताना त्यांनी बंगल्यात कुलूप तोडून आत प्रवेश करण्याची हिम्मत केली. मात्र त्यांच्या हाती काहीच लागले नाही. जिल्ह्यात खून, चोरीच्या घटना वाढल्या आहे. या पार्श्वभूमीवर चक्क खासदारांचा बंगला लुटण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला तर सर्वसामान्यांचे काय? यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top