Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: दत्तनगर येथील नव्याने सुरू होत असलेले देशी दारूचे दुकान बंद करा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
दत्तनगर येथील नव्याने सुरू होत असलेले देशी दारूचे दुकान बंद करा महापौर राखी संजय‌ कंचर्लावार यांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन  शशी ठक्कर ...

  • दत्तनगर येथील नव्याने सुरू होत असलेले देशी दारूचे दुकान बंद करा
  • महापौर राखी संजय‌ कंचर्लावार यांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन 
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
दत्तनगर येथील नव्याने सुरू होत असलेले देशी दारूचे दुकान बंद करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. जनभावना लक्षात घेता देशी दारूचे दुकान तात्काळ रद्द करण्यात यावी, अशी मागणी महापौर राखी संजय‌ कंचर्लावार यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी आज बुधवारी 27 एप्रिल रोजी अतिरिक्त  जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांना निवेदन दिले. 
चंद्रपूर शहरातील नागपूर मार्गावर असलेल्या दत्तनगर येथे नागरिकांचे श्रद्धास्थान असलेल्या दत्त मंदिर शेजारीच एक देशी दारूचे दुकान नव्याने सुरू होत आहे. अत्यंत खेदजनक बाब आहे. शेजारीच डॉ. अब्दुल कलाम मनपा शाळा आणि बालरोगतज्ञ डॉ. राम भारत यांचे हॉस्पिटल असलेल्या ठिकाणी जर हे देशी दारूचे दुकान सुरू झाले, तर नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागणार आहे. 
या परिसरात येथील नागरिक श्रद्धेपोटी मंदिरात येत असतात. मनपाच्या शाळेत विद्यार्थी शिकायला जातात. आणि लहान बालक दवाखान्यात उपचारासाठी येतात, अशा ठिकाणी देशी दारूचे दुकान सुरू होत आहे. ही बाब समाजमनाच्या अत्यंत विरोधात आहे. त्यामुळे नव्याने होऊ घातलेले हे देशी दारूचे दुकान तात्काळ रद्द करून इतर ठिकाणी हलविण्यात यावे, अशी येथील नागरिकांची मागणी आहे. जनभावना लक्षात घेता देशी दारूचे दुकान तात्काळ रद्द करण्यात यावी, अशी मागणी महापौरांनी केली. यावेळी सभागृह नेता देवानंद वाढई यांच्यासह अभीजित मोहगावकर, अमित पुगलीया, डॉ. राम भारत, निलेश लोणारे, साजिद मिर्झा, शाहरुख मिर्झा यांची उपस्थिती होती.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top