Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: भारतमातेच्या परम वैभवासाठी आयुष्य वेचणाऱ्यांचा पक्ष भाजपा स्थापनादिनाला डॉ. मंगेश गुलवाडे यांचे प्रतिपादन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
भारतमातेच्या परम वैभवासाठी आयुष्य वेचणाऱ्यांचा पक्ष भाजपा स्थापनादिनाला डॉ. मंगेश गुलवाडे यांचे प्रतिपादन भाजपा स्थापना दिन उत्साहात साजरा  ...

  • भारतमातेच्या परम वैभवासाठी आयुष्य वेचणाऱ्यांचा पक्ष भाजपा
  • स्थापनादिनाला डॉ. मंगेश गुलवाडे यांचे प्रतिपादन
  • भाजपा स्थापना दिन उत्साहात साजरा 
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
तेरा वैभव अमर रहे माँ, हम दिन चार रहे ना रहे.. हे ब्रीद अंगीकारून भाजपाची 80 च्या दशकात स्थापना झाली. आज भाजपा जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. दरम्यान अनेकांनी भारतमातेसाठी बलिदान दिले म्हणून केंद्रात व 25 राज्यात भाजपाची सत्ता आहे. भाजपा, देशासाठी आयुष्य वेचाणाऱ्यांचा पक्ष आहे असे प्रतिपादन भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे यांनी केले. ते जैन भवन येथे भारतीय जनता पार्टीच्या 42 व्या स्थापनादिनानिमित्य महानगर भाजपा तर्फे आयोजित 'पक्षश्रेष्ठींना आदरांजली' कार्यक्रमात बोलत होते. यावेळी महापौर राखी कंचर्लावार, संघटनमंत्री
राजेंद्र गांधी, महामंत्री सुभाष कासनगोट्टूवार, कोषाध्यक्ष प्रकाश धारणे, उपमहापौर राहुल पावडे, भाजपा नेते रामजी लखीया, मनोज सिंघवी, विशाल निंबाळकर, भारती दुधानी, संगीता खांडेकर, शिल्पा देशकर, अंजली घोटेकर, सचिन कोतपल्लीवार, सुरज पेद्दुलवार, सुर्यकांत कुचनवार, रितेश वर्मा, पूनम तिवारी, अँड. हरीश मंचलवार, दिवाकर पुद्दटवार, रवी लोणकर, प्रदीप किरमे, संदीप आगलावे, नितीन कारिया, संजय तिवारी, संतोष वडपल्लीवार, भाऊराव उताणे, शशीभूषण पांडेय, अनुप शर्मा, रेणूताई घोडेस्वार, रंजीता येले, वंदना डाखोरे, कोमल वासेकर, मनीषा शर्मा, राजू जोशी, राजकुमार पाठक, जीवन नंदनवार, मोहन मंचलवार, संदीप रत्नपारखी, गणेश रामगुंडवा, यश बांगडे, गोविंदा गंपावार, प्रमोद शास्त्रकार, अरविंद कोलंकर, मनोरंजन रॉय, रामजी हरणे, दिनकर सोमलकर, रामकुमार आक्केपल्लीवार, मनोज सिंघवी, परितोष मिस्त्री, सुनील हरणे, सत्यम गाणार, पंकज हलदार, स्वप्नील सोरते, गणेश रासपायले, चांद पाशा सय्यद, शिवम कपूर, महेश कोलावार, सुभाष धवस, प्रणय डंबारे, हेमंत गुहे यांची उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांचे आ. मुनगंटीवार यांच्या विकासाची गाथा पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला. याच प्रसंगी सकाळी 10 च्या सुमारास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. संचालन व प्रास्ताविक सूरज पेदूलवार यांनी केले. कासनगोट्टूवार यांनी आभार मानले.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top