आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
चंद्रपूर -
मागील महिन्याचे वीजबिल अपडेट नसल्याच्या कारणावरून रात्री वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. करिता ताबडतोब सोबत दिलेल्या वैयक्तिक मोबाइल क्रमांकावर संपर्क साधावा', असे बनावट 'एसएमएस' वैयक्तिक मोबाइल क्रमांकावरून नागरिकांना पाठविण्यात येत आहेत. अशा प्रकारचे कोणतेही 'एसएमएस' व व्हॉट्स अॅप मेसेज महावितरणकडून पाठविण्यात येत नाही. त्यामुळे या मेसेजला प्रतिसाद वा उत्तर देऊ नये, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
वेगवेगळ्या वैयक्तिक मोबाइल क्रमांकावरून पाठविण्यात येणाऱ्या परंतु महावितरणशी संबंधित 'एसएमएस' किंवा व्हॉट्स अॅप मेसेज किंवा कॉलला नागरिकांनी प्रतिसाद देऊ नये. बिल भरण्यासाठी वैयक्तिक मोबाइल क्रमांकावरून एखादी लिंक पाठविण्यात आली असेल तर संपूर्णपणे दुर्लक्ष करावे. अन्यथा यामधून आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता आहे. वैयक्तिक मोबाइल क्रमांकावरून नागरिकांना पाठविण्यात येणारे मेसेज हे बनावट असून आर्थिक फसगत होऊ शकते असे महावितरणने स्पष्ट केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.