- आमदार सुभाष धोटे यांनी केले नुकसानग्रस्त मेंढपाळांचे सांत्वन
- तातडीने नुकसान भरपाई देण्याचे अधिकाऱ्यांना दिले निर्देश
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
राजुरा तालुक्यातील मौजा सोंडो येथे वीज पडून त्यात स्थानिक मेंढपाळाच्या बकऱ्या मृत्यू पावल्या व काही जखमी झाल्या. या घटनेची माहिती मिळताच आमदार सुभाष धोटे यांनी घटनास्थळी भेट देऊन या मेंढपाळ कुटुंबास भेटून त्यांचे सांत्वन केले. त्यांच्याशी विचारपूस करुन या नुकसानग्रस्तास तातडीने शासकीय मदत मिळाली पाहिजे असे संबधीत अधिकाऱ्यांना निर्देश दिलेत. यात सोंडो येथील मेंढपाळ वासुदेव पोच्चना जिटापेनावार यांच्या मालकीचे २२ बकऱ्या जागीच मृत्यू पावल्या आहेत तर ६ बकऱ्या व ते स्वतः देखील जखमी असल्याची माहिती मिळाली. मेंढपाळ वासुदेव जिटापेंनावार यांची मुलीगी सरिता व पत्नी गंगुबाई जिटापेंनावार यांच्याशी चर्चा करुन आमदार सुभाष धोटे यांनी त्यांचे सांत्वन केले व लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळेल, प्रशासन आणि आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत असे आश्वस्त केले.
या प्रसंगी तहसीलदार हरिष गाडे, पशु वैद्यकीय अधिकारी प्रमोद जिल्लेवार, मंडळ अधिकारी सुभाष साळवे, तलाठी रमेश मेश्राम, माजी उपसभापती मंगेश गुरनुले, संतोष कुरवटकर, लहू वांढरे, आजझर सय्यद, देवराव बोल्लुवार, जीवन उमरे, सुभाष बोराडे, शंकर बोल्लुरवार यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.