Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: जेसीपीच्या धडकेत वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
जेसीपीच्या धडकेत वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स चिमूर - जेसीबीच्या सहाय्याने मातीचे ढिगारे समतोल करीत असतांना शेतमाल...

  • जेसीपीच्या धडकेत वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
चिमूर -
जेसीबीच्या सहाय्याने मातीचे ढिगारे समतोल करीत असतांना शेतमालक सूर्यभान सखाराम सोनवाने वय 75 वर्ष हे शेतातील मोहाच्या झाडाखाली बसून असतांना जेसीपी चालक रुपेश श्यामराव मुगुने वय 30 वर्षे रा. नवतळा, तालुका चिमूर यांचे जेसीपी वरील नियंत्रण सुटल्याने शेत मालकाला जोरदार धडक दिली. यामध्ये सूर्यभान सखाराम सोनवाने हे गंभीर जखमी होऊन त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
याची तक्रार भिसी पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आली असून पोलिसांनी जेसीबी चालक रुपेश शामराव मुगुने यांचेवर कलम 304(अ), 219 नुसार गुन्हा नोंद करून घटनास्थळाचा पंचनामा केला व प्रेत उत्तरीय तपासणी करीता व उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे पाठविण्यात आले. पुढील तपास भिसी पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रकाश राऊत यांचे मार्गदर्शनात पीएसआय सचिन जंगम करीत आहेत. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top