Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: आकाशातून पडलेली ती रिंग आणि सिलेंडर ‘ब्लॅक स्कॉय’ उपग्रहाचे अवशेष...
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आकाशातून पडलेली ती रिंग आणि सिलेंडर ‘ब्लॅक स्कॉय’ उपग्रहाचे अवशेष... स्काय वॉच ग्रुप ने व्यक्त केला अंदाज आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स चंद...

  • आकाशातून पडलेली ती रिंग आणि सिलेंडर ‘ब्लॅक स्कॉय’ उपग्रहाचे अवशेष...
  • स्काय वॉच ग्रुप ने व्यक्त केला अंदाज
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
चंद्रपूर -
दि.२/४/२०२२ रोजी संध्याकाळी ७.४५ वाजता आकाशात मोठ्या उल्का पडल्या असाव्या असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता, परंतु त्या वस्तू उल्का नसून उपग्रहाचे किंवा रॉकेट चे तुकडे आहेत असा प्राथमिक अंदाज स्काय वॉच युपचे अध्यक्ष प्रा सुरेश चोपणे यांनी व्यक्त केला होता.
प्रत्यक्ष पाहणीकरिता ३/४/२२ रोजी स्काय वाच युपची एक चमू गेली आणि अवकाशीय वस्तूची पाहणी केली असता त्यात काल पडलेली रिंग आणि आज आढळलेली गोल वस्तू या न्यूजिलंडच्या ब्लॅक स्काय उपग्रह सोडन्यासाठी वापरले जाणारे रॉकेट चे अवशेष आहेत असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला. प्रशासन तंत्रज्ञाची चमू बोलावून त्या अवकाशीय वस्तूंची खात्री करावी आणि दोषी देश-संस्थावर कारवाही करावी अशी मागणी स्काय वाच युपतर्फे करीत आहोत. महाराष्ट्रातून अनेक लोकांनी रात्री ७.४५ वा अवकाशातून आगीचे गोळे पडताना पाहिले होते. बहतेकांनी याला उल्कावर्षाव समजले होते. परंतु स्काय वाच युपतर्फे हे तुकडे उपग्रहाचे किंवा रॉकेट चे आहेत असा अंदाज व्यक्त केला होता.कारण कालच न्यजिलंड देशाचे ब्लॅक स्काय नावाचा उपग्रह संध्याकाळी ६.१० ला सोडण्यात आला होता.ती वेळ आणि मागे पाहता हे त्याच रॉकेटचे तुकडे असावेत असा अंदाज आहे.
चीनचे सुद्धा एक रॉकेट पडणार असल्याचे बोलले जात होते परंतु त्याची शक्यता वाटत नाही. या पडलेल्या अवकाशीय वस्तूंची पाहणी आणि खात्री करण्यासाठी ग्रुपचे अध्यक्ष प्रा सुरेश चोपणे आणि सदस्य प्रा सचिन वझलवार आणि प्रा योगेश दुधपचारे सिंदेवाही येथे गेले आणि प्रत्यक्ष स्थळाची आणि वस्तूंची पाहणी केली असता तिथे लाडबोरी या खेड्यात पडलेला रॉकेट चा बाह्य पत्रा आणि पवनपार जवळ एक गोल आकाराचा हायड्रोजन स्पिअर हा इंधन दाब नियंत्रण करणारी गोल सिलेंडर आढळली. अजूनही काही वस्तू परिसरात आढळण्याची शक्यता आहे. मेटेवर शॉवर एप्रिल 2022 वरील आमच्या निरीक्षणावरून ह्या अवकाशीय वस्तू उपग्रहाच्या रॉकेटचीच असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. हि गोल रिंग १० बाय १० फुट व्यास. ८ इंच रुंद आणि ५० किलोची आहे. तर दुसरी गोल वस्तू रॉकेटचाच एक भाग असून ती २ फुट व्यासाची आढळली, अजून काहि वस्तू परिसरात मिळण्याची शक्यता आहे. युप तर्फे लाडबोरी खेड्यातील लोकांशी चर्चा केली. तसेच पोलीस प्रशासन आणि तहसील प्रशासनाशी चर्चा करून इतर तुकडे शोधण्याची.सविस्तर अहवाल शासनाकडे पाठविण्यासाठी योग्य ती कारवाही अशी विनंती केली. तहसील आणि जिल्हा प्रशासन परिसरातील सर्व संभाव्य वस्तू गोळा करून सविस्तर अहवाल शासनाकडे पाठवविणार असून पडलेल्या वस्तूंची पाहणी आणि ओळख करण्यासाठी तंत्रज्ञांची चमू बोलविणार आहे.आम्ही सुधा मिळालेल्या पुराव्या च्या आणि निरीक्षणाच्या आधारे शासन प्रशासन, इसरो आणि न्यूजिलंड च्या अवकाश संस्थेला याची माहिती देणार आहोत. अश्या रॉकेट पडल्याच्या घटना जगात क्वचित घडतात कारण बहुदा हे भाग समुद्रात पडावे किंवा निर्मनुष्य ठिकाणी पडावे अश्या बेतानेच सोडले जातात. परंतु तंत्रज्ञानाच्या आणि मानवी चुकीने क्वचित मानवी वस्तीत हे भाग पडतात. लाडबोरी या लहानश्या गावात अगदी सभोवताली घरे असताना अगदी त्यांच्या मधोमध हि ५० किलो वजनाची तप्त रिंग पडली आणि फार मोठा अनर्थ (प्राणहानी आणि वित्तहानी) घडता घडता वाचला. अन्यथा तेथील घरे जळून प्राणहानी झाली असती.
या घटनेची प्रशासनाने चोकशी करून संबंधित देश आणि अवकाश संस्थेवर दंडात्मक कारवाही करावी अशी मागणी आम्ही स्काय वाच ग्रुपचा वतीने करण्यात आली आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top